मंकीपॉक्ससंदर्भात केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी, त्रिसूत्रीवर काम करण्याचे आदेश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 1, 2022

मंकीपॉक्ससंदर्भात केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी, त्रिसूत्रीवर काम करण्याचे आदेश

https://ift.tt/Gs8u45j
नवी दिल्ली : ब्रिटनसह, यूरोपियन आणि पाश्चिमात्य देशांमध्ये आढळलेल्या मंकीपॉक्सच्या रुग्णांमुळं भारत सरकार सतर्क झालं आहे. भारत सरकारनं जिल्हा सनियंत्रण समित्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एक जरी रुग्ण आढळला तरी त्याला संसर्गाचा विस्फोट म्हणून गृहित धरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंकीपॉक्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी साथरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सखोल माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं मंकीपॉक्स आजार व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आरोग्य मंत्रालयानं निरीक्षण, आजारांच्या लक्षणांची तातडीन ओळख आणि विलगीकरणावर जोर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंकीपॉक्स रुग्णाचा दुसऱ्या व्यक्तीशी येणारा संबंध टाळण्यावर भर द्यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. भारतानं मंकीपॉक्स महामारीचा सामना करण्यासाठी तयार राहावे यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. जिल्हा पातळीवर रुग्णांला असणाऱ्या आजाराचं तातडीनं निदान करणे, त्याला नेमका ससंर्ग कुठून झाला याची माहिती मिळवणे आणि संबंधित व्यक्तीला विलगीकरणात ठेवणे यावर काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालायच्या माहितीनुसार मंकीपॉक्स संदर्भातील नमुने चाचणे तपासणीसाठी आयसीएमआर- राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना देण्यात आले आहेत. मंकीपॉक्सच्या रुग्णांची नोंद मध्य आणि पश्चिम आफ्रिकन देशांमध्ये झालेली आहे. यामध्ये कॅमेरुन, मध्य आशियाई रिपब्लिक, कोटे डेल्वोयर, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कोंगो, गॅबॉन, लिबेरिया, नायजेरिया, सीरा लिओन आणि अमेरिका,ब्रिटन, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँडस, पोर्तुगाल, स्वीडन, स्पेन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इस्त्राईल आणि स्वित्झरलँड या देशामध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. भारतात अजून मंकीपॉक्सचा रुग्ण सापडलेला नाही. भारत सरकारनं सतर्क होत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दुसरीकडे नायजेरियामध्ये मंकीपॉक्समुळं एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मंकीपॉक्सचे रुग्ण ब्रिटनमध्ये ही मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. मंकीपॉक्स १९७० च्या दशकात आफ्रिकेत आढळला होता.