भारताच्या अजून एका बॉक्सरने पदक जिंकले, सागरने पटकावले रौप्यपदक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 8, 2022

भारताच्या अजून एका बॉक्सरने पदक जिंकले, सागरने पटकावले रौप्यपदक

https://ift.tt/dIqTs13
बर्मिंगहम : भारताचा बॉक्सर सागर अहलवातने ९२ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत दमदार कामगिरी केली खरी, पण यावेळी त्याला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताच्या सागरला यावेळी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या सागरला इंग्लंडच्या डेलिशिअस ओरीविरुद्ध 0-5 असा पराभव पत्करावा लागला. भारताचे दिवसातील १५ वे पदक ठरले. निखत झरीनने जिंकलं सुवर्णपदक भारताची विश्वविजेती महिला बॉक्सर निखत झरीनने आजच्या फायनलमध्ये दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. निखतने यापूर्वी विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती, तर आशियाई स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकावले होते. अमित पंघलने पटकावले सुवर्णपदकपुरुषांच्या ५१ किलो फ्लायवेट प्रकारात अमितने टोकियो ऑलिम्पिकच्या निराशेवर मात करून भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. त्याने इंग्लंडच्या किरन मॅकडोनाल्ड अमितचा एकतर्फी ५-० असा पराभव करून सामना जिंकला. अमित पंघालचे राष्ट्रकुल स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक आहे. २०१८च्या गोल्ड कोस्ट गेम्समध्येही तो सहभागी झाला होता. तेथे लाइट फ्लायवेट प्रकारातील अंतिम सामन्यात त्याचा पराभव झाला होता. याशिवाय पंघालचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही पदक आहे. याच कारणामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला अमित पंघालकडून सुवर्णाची अपेक्षा होती आणि त्याने कोणालाही निराश न करता भारताला सुवर्ण मिळवून दिले. नितूचे सुवर्ण यशनितू घनघासने महिलांच्या ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या डेमी-जेड रेझ्टनचा ५-० असा पराभव करत २०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुलमधील हे भारताचे पहिले बॉक्सिंग सुवर्ण आहे. दोन वेळा युवा विश्व चॅम्पियन ठरलेल्या नितूने सुरुवात आक्रमकपणे केली आणि तिच्या डावीकडून प्रतिस्पर्ध्याच्या चेहऱ्याला लवकर धक्का दिला. रेझ्टनने रेंज बंद करण्याचा प्रयत्न केला पण नितू क्लिंचमध्ये दोन अपरकटमध्ये आली. नीतू यावेळी थोडीशी घसरली, पण शेवटच्या दिशेने काही ठोसे मारून सावरला आणि पहिली फेरी ४-१ ने जिंकली. तिहेरी उडीमध्ये पटकावली दोन पदकं...भारताने तिहेरी उडी प्रकारात दमदार कामगिरी केली. भारताच्या एडलहस पॉलने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले, तर अब्दुल्ला अबूबेकरने रौप्यपदक आपल्या नावावर केले. भारताच्या प्रवीण चिथरवेलला मात्र पदक जिंकण्यात अपयश आले.