
कोल्हापूर/आजरा : राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आहे, तोपर्यंत कोल्हापूरचे खासदार () मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात राहतील, त्यानंतर ते आमच्यासोबत असतील, असा मिश्किल टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंतराव पाटील () यांनी लगावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात उचंगी (ता. आजरा) येथील प्रकल्पस्थळावर जलपूजनाचा कार्यक्रम होता. यावेळी माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जयवंतराव शिंपी, सुधीर देसाई, रामाप्पा करिगार, भिक्मामा गावडे, बाबासाहेब पाटील, रचना होलम प्रमुख उपस्थित होते. आजरा येथील उचंगी प्रकल्पातील जल पूजन प्रसंगी खा. संजय मंडलिक आणि माजी मंत्री हे दोन्ही नेते शिवसेनेत बंड झाल्यानंतर पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी दोघांमध्ये तुफान टोलेबाजी पाहायला मिळाली. हेही वाचा : यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, आधी पुनर्वसन मग धरण हे कितीही हक्काने सांगत आलो, तरी धरणग्रस्तांचे प्रश्न सुटण्यास अनेक अडचणी असतात. सरकार कोणाचेही असेल तरी धरणग्रस्तांचे प्रश्न वेळेत सुटत नसतात. मात्र जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी दोन चार वेळा खासदार संजय मंडलिक माझ्याकडे आले होते. तर आमदार राजेश पाटील यांनीही या प्रकलापसाठी सातत्याने पाठपुरावा केला. आज दोघांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्यात सध्या आमची सत्ता नसली, तरी येथील धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करत राहू. जिल्ह्यातील नेत्यांच्या एकजूटीने येथील धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवू, असे पाटील म्हणाले. तसेच राज्यात सध्या शिंदे सरकार आहे आणि जोपर्यंत शिंदे सरकार आहे तोपर्यंत खासदार संजय मंडलिक हे त्यांच्यासोबत शिंदे गटात आहेत. नंतर ते आमच्या सोबतच असतील असा मिश्किल टोला पाटलांनी लगावला. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. हेही वाचा :