
: एका विचित्र कार्प माशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. माशाला दोन तोंड आणि दोन डोळे आहेत, असे हा व्हिडिओ पाहून ट्विटर यूजर्स म्हणत आहेत. त्याच वेळी, बरेच लोक याला सोव्हिएत युनियनच्या काळातील चेर्नोबिल अणु प्रकल्पाच्या दुर्घटनेमुळे झालेल्या रेडिएशनमुळे झालेला परिणाम आहे असे म्हणत आहेत. कारण चेर्नोबिल जवळील तलावातील सर्व मासे मृत झाले होते. माशाची स्थिती कोणत्या प्रदूणणामुळे झाली आहे किंवा कसे हे हा व्हिडिओ पाहून शास्त्रज्ञ स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. हे जाणून घेण्यासाठी चाचणी करावी लागेल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ( caught in fishermen net watch video) कार्प माशांना दोन चेहरे असूनही ते पूर्णपणे निरोगी आणि विकसित दिसतात. अशा परिस्थितीत, तज्ञांचे असे मत आहे की हे घडण्यामागील कारण प्रदूषण नाही. कारण प्रदूषण हे कारण असते तर मासे आधीच मेले असते. यूएसमधील दक्षिण कॅरोलिना विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ डॉ. टिमोथी मुसो म्हणतात, 'बहुतेक रेडिएशनमुळे होणाऱ्या म्यूटेशनमुळे वाढीस प्रतिबंध होतो. त्यामुळे जगण्याची आणि पुनरुत्पादनाची क्षमताही कमी होते. काय म्हणतात शास्त्रज्ञ प्राध्यापक मुसो म्हणतात की, अशा प्रकारची म्यूटेशन फार काळ टिकत नाही. ती बहुतेक मंद आणि कमी सक्षम असतात आणि या प्रकरणात असे जीव प्राणी किंवा मानवाकडून मारले जाण्याची शक्यता असते. प्रोफेसर मुसो यांनी चेर्नोबिलचाही अभ्यास केला आहे. माशांमध्ये काय बिघाड झाला याची नेमकी माहिती प्रयोगातूनच कळू शकते, असे ते म्हणाले. त्यातही केवळ एक माशावर नव्हे, तर शेकडो-हजारो माशांवर प्रयोग करावे लागणार आहेत. म्हणून कोणत्याही प्रयोगाशिवाय ठोस काही सांगता येत नाही, असे ते म्हणाले. सोशल मीडियावर युजरने काय म्हटले व्हिडिओ पाहिल्यावर असे दिसते की माशाला दोन तोंडे आणि चार डोळे आहेत. तथापि, काही शास्त्रज्ञ आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की या माशाला एक तोंड आणि दुसरे तोंड दिसते ती एक जखम आहे. ही जखम चुकीच्या पद्धतीने बरी झाल्यामुळे तशी दिसत आहे. त्याच प्रमाणे जे माशांचे डोळे आहेत असे वाटते ते माशाचे नाक आहे, असेही काहींचे म्हणणे आहे. आशियाई कार्प माशांमध्ये, नाक त्यांच्या तोंडाच्या वर बनलेले असते. मात्र, असे असूनही लोक सोशल मीडियावर आंदाज लावत होते असे दिसते.