साखर झोपेत असलेल्या प्रवाशांवर काळाचा घाला; नाशिकमध्ये बर्निंग बसचा थरार, नेमकं काय घडलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 8, 2022

साखर झोपेत असलेल्या प्रवाशांवर काळाचा घाला; नाशिकमध्ये बर्निंग बसचा थरार, नेमकं काय घडलं

https://ift.tt/yOBpdXn
नाशिकः नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे भीषण अपघात घडला आहे. मिरची चौकात पहाटेच्या सुमारास खासगी बसला अचानक आग लागली असून या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. ही बस यवतमाळहून मुंबईकडे निघाली होती. मात्र वाटेतच बसला आग लागली असल्याची माहिती समोर येतेय. हा अपघात कसा घडला याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. () पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा अपघात घडला आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस असून यवतमाळच्या पुसदकडून मुंबईकडे निघाली होती. मात्र, नाशिकच्या औरंगाबादरोडवरील मिरची हॉटेल जवळ बसचा अपघात झाला. आयशर ट्रक आणि बसमध्ये जोरात धडक बसल्यामुळं हा अपघात घडला. अपघातानंतर बसला भीषण आग लागली. पाहता पाहता ही आग पसरत गेली आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. अपघातावेळी बसमध्ये एकूण ३६ प्रवासी होते त्यातील ११ प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, एक प्रवाशी गंभीर जखमी आहे. तर बाकी किरकोळ जखमी आहेत. जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयातून दुसरीकडे उपचारांसाठी हलवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाधरन डी यांनी दिली आहे. वाचाः ू महापालिका आयुक्त घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी झोन-१ च्या सगळ्या पोलिस ठाण्यातील पथके कामाला लावली असून ३ पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. उर्वरित तीन टीम जिल्हा रुग्णालयात. पंचनामा आणि पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. मामा आणि काका सोबत जात असताना गाडीला अपघात झाला. आम्ही खिडकीतून उड्या घेतल्या. कल्याणला जात होतो. मामा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक आहे. अतिशय भयंकर अपघात होता. आम्ही वाचलो हेच सुदैव - पिराजी सुभाष धोत्रे, रा. अरणी, यवतमाळ वाचाः