एकनाथ शिंदे गर्दी दिसली म्हणून काहीही बोलत सुटले, उद्धव ठाकरेंच्या भाषणालाच प्रतिसाद: अजित पवार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 8, 2022

एकनाथ शिंदे गर्दी दिसली म्हणून काहीही बोलत सुटले, उद्धव ठाकरेंच्या भाषणालाच प्रतिसाद: अजित पवार

https://ift.tt/zIYFoyV
कोल्हापूर : शिवसेना ज्या ज्या वेळी फुटली, त्या त्या वेळी फुटलेले निवडून आले नाहीत, नारायण राणेंनाही हा अनुभव आला आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत या शिवसेनेतून फुटलेल्या चाळीस गद्दारांना जागा दाखवू द्या, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या एका कार्यक्रमात केले. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले पोर्ले येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पवारांनी भाजप आणि फुटीर शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार तोफ डागली. ते म्ह्णाले, सत्ता येते आणि जाते. सध्या शिंदे गट आणि भाजप आमदारांनाच निधी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. पण अशा गोष्टी कुणी करत असेल तर कोणी ताम्रपट घेऊन आला नाही.एकनाथ शिंदे काही कायमचे मुख्यमंत्री पदावर बसणार नाहीत.१४५ चा आकडा कमी झाला की तेही सत्तेतून जातील असा टोला मारताना पवार म्हणाले, दसरा मेळाव्यात तुमच्या भाषणावेळी लोक निघून गेले. बऱ्याच लोकांना का आलो हेच माहीत नव्हते. एस.टी.ला तुम्ही दहा कोटी भरता, कुठून आले हे पैसे ? असा सवालही त्यांनी केला. शिंदे साहेब, हा महाराष्ट्र आहे, हे इथे चालणार नाही असा इशारा देताना पवार म्हणाले, या मेळाव्यात महागाई, बेरोजगारी यावर बोलणं अपेक्षित होते. ते सोडून गर्दी दिसली म्हणून तुम्ही काहीही बोलत सुटला. तरीही तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या भाषणाला अधिक प्रतिसाद मिळाला. भाजपवर टीका करताना पवार म्हणाले , जे हातात आहे, ते चालवता येईना आणि भाजप देशातील बिगर भाजपचे सरकार पाडत आहे. कर्नाटक, महाराष्ट्र सरकार पाडले. आपल्या हातात आहेत, ते आमदार जातील म्ह्णून सध्या मंत्रिमंडळ विस्तार करत नाहीत. दरम्यान, अजित पवार यांनी स्वत: च्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या देखील देत कामाला लागण्याचे आदेश दिले. यावेळी माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.