हिरो बनायला गेला पण भारताच्या पराभवाचा व्हिलन ठरला, संजूला साथ न देणारा हा खेळाडू कोण पाहा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 7, 2022

हिरो बनायला गेला पण भारताच्या पराभवाचा व्हिलन ठरला, संजूला साथ न देणारा हा खेळाडू कोण पाहा

https://ift.tt/2SgDnXM
लखनौ : भारतीय संघाला विजय मिळवून देण्यासाठी संजू सॅमसन हा जीवापाड प्रयत्न करत होता. पण त्याचवेळी भारताचा एक खेळाडू हिरो बनण्याचा प्रयत्न करत होता. पण हिरो बनण्याच्या नादात तो भारताच्या पराभवाचा व्हिलन ठरल्याचेच यावेळी पाहायला मिळाले. संजू सॅमसन हा अखेरपर्यंत खेळपट्टीवर राहिला आणि भारताच्या विजयाच्या आशा कायम होत्या. संजूने अर्धशतक झळकावले आणि तो आता भारताला विजय मिळवून देईल, असे वाटत होते. संजू आक्रमक फटकेबाजी करत होता. त्यावेळी फक्त त्याला स्ट्राइक देण्याची गरज होती. पण भारताचा एक खेळाडू आपल्याला मोठा बॅट्समन समजत मोठे फटके मारायला गेला आणि त्याने चेंडू वाया घालवले. त्यामुळेच तो या सामन्याचा व्हिलन ठरला. संजू दमदार फटकेबाजी करत होता आणि भारत सामना जिंकेल, असे चित्र निर्माण झाले होते. पण त्याचवेळी अवेश खान फलंदाजीला आला आणि तिथेच भारताच्या हातून सामना निसटला. कारण अवेश यावेळी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत होता. त्याला यावेळी मोठे फटके मारण्याची काहीच गरज नव्हती. त्याला यावेळी फक्त एक धाव काढत संजूला स्ट्राइक द्यायची होती. मोक्याच्या क्षणी अवेश यावेळी सहा चेंडू खेळला, ज्यामध्ये फक्त दोनच चेंडूवर त्याला धावा करता आल्या. त्यावेळी जर हे चार चेंडू वाचले असते आणि त्यावर जर संजूला फलंदाजी करण्याची संधी मिळाली असती तर नक्कीच सामन्याचे रुप वेगळे झाले असते. पण अवेशला ही गोष्ट मान्यच नव्हती. अवेश हा पुढे येऊन मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत होता, ज्या गोष्टीचा त्याला काहीच गरज नव्हती. अवेशने यावेळी सहा चेंडूंमध्ये तीन धावा केल्या, पण मोक्याच्या क्षणी नेमकं काय करायचं हे त्याला कळलं नाही. आपण मोठे फटके मारून सामना संपवू, असेच अवेशचे हावभान दर्शवत होते. पण संजू खेळपट्टीवर सेट झाला होता आणि त्याचे चांगले फटके लागत होते. पण अवेशने ही गोष्ट ध्यानात घेतलीच नाही. त्यामुळे तोच या सामन्यात भारताच्या पराभवाचा व्हिलन ठरला.