मित्रांसोबत पार्टी करायला गेला, पण दोस्तांनीच घात केला, गुंगीचे औषध देत तरुणासोबत केलं भयानक कृत्य - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 5, 2022

मित्रांसोबत पार्टी करायला गेला, पण दोस्तांनीच घात केला, गुंगीचे औषध देत तरुणासोबत केलं भयानक कृत्य

https://ift.tt/WrOi3Lk
डोंबिवली: डोंबिवलीत राहणाऱ्या एका तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. कोल्हापूरमध्ये शिकायला गेलेल्या तरुणाचा त्याच्याच मित्रांनी विश्वासघात केला आहे. मित्रांनीच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला ३० लाखांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून एकाला अटक केली आहे. डोंबिवलीत राहणारा एक तरुण कोल्हापूरमधील एका मोठया कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. २०२० मध्ये हा तरुण आपल्या काही मित्रांसोबत एका फार्म हाऊसवर पार्टी करण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी पिडीत तरुणाच्या मित्रांनी त्याच्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचे ओैषध टाकून त्याचे एका तरुणीसोबतचे अश्लील व्हीडीओ काढले. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. वाचाः पीडीत तरुणाला सातत्याने धमकावत त्याच्याकडून ३० लाख रुपये किंमतीचे आठशे ग्रॅम वजनाचे दागिने लाटले आहेत. हे कृत्य करणारे पिडीत तरुणाचे मित्रच होते. त्यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे नाव संजय राजपूत असे आहे. तो कोल्हापूर येथील इचलकरंजी येथे राहणार आहे. या प्रकरणीत आणखीन किती जणं सहभागी आहेत. त्यात त्यांचा काय सहभाग आहे याबाबत पोलिसांकडून त्याचा तपास सुरु आहे. तपासासाठी टिळक नगर पोलिसांचे तपास पथक कोल्हापूरला रवाना झाले आहे. वाचाः अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणात फिर्यादी आणि आरोपींच्या जबाबात तफावत येत असल्याने पोलिस अन्य बाजूनेही या प्रकरणाचा तपास करीत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. वाचाः