झाशीः प्रेमात लोक आंधळे होतात हे तुम्ही ऐकलं असेलच पण प्रेमात पडलेल्या एका २० वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. शुभमने इन्स्टाग्रामवर तेरे बिन मरजांवा गाण्यावर एक रिल बनवलं त्या रिलमध्ये गर्लफ्रेंडचा फोटो ठेवला आणि नंतर तिच्याच घरासमोर विष पिऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शुभमने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी कुटुंबाला कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व अत्यावस्थ अवस्थेत असलेल्या शुभमला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. प्रेयसीच्या कुटुंबांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप शुभमचे कुटुंबीय करत आहेत. शुभम हा झाशीतील बडागांव गेटबाहेर मास्टर कॉलोनीमध्ये वास्तव्यास होता. तो मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होता. तिथेच जवळपास राहणाऱ्या एका मुलीसोबत त्याचे सूत जुळले होते. मात्र, बुधवारी दुपारी शुभने इन्स्टाग्रामवर रील अपलोड केली होती.त्यात शुभमने त्याचा आणि प्रेयसीचा फोटो लावला होता. तर, रीलमध्ये तेरे बिना मरजावां गाणं लावलं होतं. त्यानंतर तो बाइकने प्रेयसीच्या घरासमोर गेला आणि विष घेत आत्महत्या केली. वाचाः शुभमने विष प्यायल्याची माहिती तरुणीच्या वडिलांनी त्याचा मित्राला दिली होती. त्यानंतर त्याच्या घरचे लगोलग घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तिथे त्याची बाइक उभी असून फोनही तिथेच होता. त्यानंतर आजूबाजूला शोध घेतल्यानंतर शिवम मैदानात सापडला तेव्हा त्याच्या खिशात विष होते. त्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. वाचाः शुभमच्या वडिलांनी आणि भावाने तरुणीच्या कुटुंबीयावर आरोप केले आहेत. शिवमला त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबातील सदस्य धमकावत होते, असं त्यानं म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. वाचाः