T20 WC 2022: भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये होऊ शकते फायनल मॅच; असे आहे समीकरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 4, 2022

T20 WC 2022: भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये होऊ शकते फायनल मॅच; असे आहे समीकरण

https://ift.tt/zp8qrw9
नवी दिल्ली: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील ग्रुप फेरीतील लढती आता आणखी रंजक झाल्या आहेत. सुपर १२ मधील लढती अखेरच्या टप्प्यावर आल्या असल्या तरी अद्याप सेमीफायनलचे संघ ठरले नाहीत. स्पर्धेत अनेक मोठे फेरबदल करणारे निकाल झाले आहेत. याचा सर्वात मोठा फटका इंग्लंड आणि पकिस्तान सारख्या संघांना बसला आहे, त्याच बरोबर पावसाने देखील अनेक संघांचे समीकरण बिघडवले आहे. ग्रुप २ मधील मजबूत संघ पाकिस्तानला सुरुवातीच्या दोन लढतीत भारत आणि झिम्बाब्वेकडून पराभूत व्हावे लागले. त्यानंतर सलग दोन लढतीत विजय मिळून त्यांनी सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा कामय ठेवल्या आहेत. पाकिस्तानचा संघ अजूनही सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतो आणि फायनलमध्ये भारत-पाकिस्तान अशी लढत होऊ शकते. मात्र त्यासाठी ग्रुप २ मध्ये दोन धक्कादायक विजयांची नोंद होण्याची गरज आहे. वाचा- ... असे आहे समीकरण पाकिस्तानने काल दक्षिण आफ्रिकेचा ३३ धावांनी पराभव केला. त्याचे आता ४ गुण झाले आहेत. भारताकडे ६ तर आफ्रिकेकडे ५ गुण आहेत. ग्रुपमधील झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स हे दोन संघ स्पर्धेबाहेर झाले आहेत. भारताची अखेरची लढत झिम्बाब्वे तर आफ्रिकेची नेदरलँड्सविरुद्ध आहे. जर नेदरलँड्सने आफ्रिकेला धक्का दिला तर त्यांचे फ्कत ५ गुण होतील. अशाच पाकिस्तानला अखेरची मॅच मोठ्या फरकाने जिंकून सेमीफायनलमध्ये पोहोचता येईल. असे झाल्यास ग्रुप २ मध्ये भारत अव्वल तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर येईल. सेमीफायनलमध्ये भारताची लढत न्यूझीलंड विरुद्ध तर पाकिस्तानची लढत इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल. त्यामुळेच वर्ल्डकपमध्ये फायनलमध्ये मॅच भारत आणि पाकिस्तान यांच्यात होण्याची शक्यता अजून कायम आहे. मात्र यासाठी धक्कादायक निकालाची गरज आहे. पाऊस करू शकतो पाकिस्तानचा गेम स्पर्धेत अनेक सामन्यात पावसामुळे सामने रद्द करावे लागले आहेत. जर द.आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यातील लढत पावसामुळे रद्द झाली तरी पाकिस्तानच्या आशेवर पाणी फिरू शकते. २००७ची फायनल पहिल्या म्हणजे २००७ साली झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल मॅच झाली होती. तेव्हा भारताने विजय मिळवत विजेतेपद मिळवले होते.