
म. टा. प्रतिनिधी, फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईने सजविलेल्या दत्तमंदिरांमध्ये बुधवारी संध्याकाळी दत्तजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील प्रमुख दत्त मंदिरांसह उपनगरातील वेगवेगळ्या भागात तसेच सोसायट्यांमधील लहान-मोठी मंदिरे, गणेशोत्सव मंडळे आणि विविध संस्थांतर्फे दत्त जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दत्तमंदिरामध्ये सकाळी होमहवन, गुरुचरित्र सामूहिक पारायणही करण्यात आले; तर काही ठिकाणी भक्तिसंगीताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. फुलांच्या सजावटीने मंदिरांचे गाभारे सजविण्यात आले होते. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. क्लिक करा आणि वाचा- मंदिराचे यंदाचे १२५ वे वर्ष मंदिराचे यंदा १२५ वे वर्ष असल्याने पायथ्यापासून कळसापर्यंत मंदिरात फुलांची आरास केली होती. दत्तमहाराजांच्या विलोभनीय मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. राष्ट्रीय कीर्तनकार हरीभक्त परायण चारुदत्तबुवा आफळे यांनी कीर्तनातून दत्तजन्माची कहाणी आणि दत्तगुरुंचे महात्म्य सांगितले. क्लिक करा आणि वाचा- सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी झाला श्री दत्तजन्म सोहळा सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी श्री दत्तजन्म सोहळा झाला. भाविकांनी पाळण्यावर पुष्पवृष्टी केली. दत्तगुरुंच्या पादुकांची पालखी नगरप्रदक्षिणा मंदिरातून वाजत-गाजत निघाली. नगरप्रदक्षिणेत घोडे, उंट, विद्युत छत्र्यांसह बँड, रुद्र ढोल ताशा पथक आणि दत्तमहाराजांच्या पादुका ठेवलेल्या पारंपरिक बग्ग्गीने पुणेकरांचे लक्ष वेधले. दत्तमंदिरापासून निघालेली पालखी रामेश्वर चौक, टिळक पुतळा मंडई, शनिपार, अप्पा बळवंत चौक, बुधवार पेठ मार्गे मंदिरात आली. क्लिक करा आणि वाचा-