मुंबईकरांना मिळणार शुद्ध हवा! 'या' यंत्राबाबत पालिकेचा हवामान कृती आराखडा कक्ष लवकरच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 28, 2023

मुंबईकरांना मिळणार शुद्ध हवा! 'या' यंत्राबाबत पालिकेचा हवामान कृती आराखडा कक्ष लवकरच

https://ift.tt/UMJIeKG
मुंबई : सातत्याने हवेच्या ढासळत्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मुंबई हवामान कृती आराखडा बनवला आहे. या आराखड्यानुसार हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. या अंतर्गत वाहतूक नाक्यांवर प्रदूषित हवेतील घटकांचे मोजमाप केले जाणार आहे. तसेच १० मीटर परिघात पाच हजार घन फूट प्रतिमिनिट वेगाने हवेतील सुक्ष्मकण (२.५ मायक्रॉनपर्यंत) शोषून हवा शुद्ध करण्यासाठी पाच ठिकाणी प्रत्येकी दोन यंत्रे बसविण्याचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येत आहे, अशी माहिती पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली आहे.मुंबई महापालिकेने मुंबई हवामान कृती आराखडा बनवला आहे. हा आराखडा राबविण्यासाठी अभियांत्रिकी आणि वास्तूशास्त्रज्ञांचा समावेश असलेला मुंबई हवामान कृती आराखडा कक्ष स्थापण्याचे काम चालू आहे, असेही पालिका आयुक्तांनी सांगितले.७४व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमात पालिका आयुक्तांनी आगामी काळातील पालिकेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. इ- यांत्रिकी झाडूची खरेदी व बॅटरी चार्जिंग स्टेशन खरेदी करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. ज्याठिकाणी मनुष्यबळ वापरून कचरा उचलणे जिकरीचे जाते तेथे वाहनांच्या सांगाड्यावर कमी दाब प्रणालीची यंत्रणा बसवून कचरा उचलला जातो आहे. सध्यस्थितीत ७ परिमंडळामध्ये प्रत्येकी एक वाहन याकामी वापरण्यात येत आहे. सुमारे ७० हेक्टर क्षेत्रावरील हरितपट्टा आणि मनोरंजन विकासासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर २०२३मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे.