मुंबई: प्रसिद्ध पॉप स्टार टेलर स्विफ्टकडे असलेले पाळीव प्राणी जगातील अनेक लोकांपेक्षा श्रीमंत आहेत. हे वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरं आहे. टेलर स्विफ्टजवळ जी मांजर आहे तिची किंमत तब्बल ८०० कोटी रुपये (९७ दशलक्ष डॉलर) इतकी आहे. हे जगातील तिसरे सर्वात महाग पाळीव प्राणी आहे. काय आहे या मांजरीत असं खास रोलिंग स्टोनच्या रिपोर्टनुसार, या मांजरीचे नाव ऑलिव्हिया बेन्सन आहे. एका माहितीनुसार, इन्स्टाग्रामवर Nala.Cat या नावाने खातं असलेली मांजर दुसऱ्या स्थानावर आहे. तिची किंमत १०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास ८२४ कोटी रुपये आहे. इन्स्टाग्रामवर नालाचे ४.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. सर्वात जास्त फॉलो केलेल्या मांजरीचा गिनीज रेकॉर्डही तिच्या नावे आहे. हेही वाचा - ऑलिव्हियाचे जगभरात चाहते ऑलिव्हिया बेन्सनचे इन्स्टाग्रामवर खाते नसले तरी ऑल अबाउट कॅटच्या मते, ऑलिव्हियाचे जगभरात चाहते आहेत. ती अनेक व्हिडिओंमध्ये देखील दिसली आहे. तसेच, टेलर स्विफ्टची ही मांजर अनेक जाहिरातींमध्येही दिसली आहे. टेलर स्विफ्टने २०१४ मध्ये ऑलिव्हियाला दत्तक घेतले. तेव्हापासून ती तिच्यासोबत आहे. टेलर स्विफ्ट ही जगातील सर्वाधिक कमाई करणारी गायिका आहे. ती दरवर्षी सुमारे १५० दशलक्ष डॉलर कमवते. हेही वाचा - एका फोटोला २ लाख लाईक्स मांजरीची एवढी किंमत कशी पडली हेही या अहवालात सांगण्यात आले आहे. तसेच, २०२० मध्ये टेलर स्विफ्टने या मांजरीचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ऑलिव्हिया बेन्सन ही पलंगावर बसलेली दिसत आहे. त्या फोटोला दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हेही वाचा -