अनैतिक संबंधातून पतीचा काटा काढला; हत्येचे गूढ अखेर उकलले, 'त्या' व्हिडिओमुळं सत्य समोर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 4, 2023

अनैतिक संबंधातून पतीचा काटा काढला; हत्येचे गूढ अखेर उकलले, 'त्या' व्हिडिओमुळं सत्य समोर

https://ift.tt/RGfB42Y
हिंगोलीः जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापुर येथे शेख शकील यांच्या खून खटल्यात आता रंगतदार वळण आलं असून आणखी दोघांचा खुनात सहभाग असल्याचा जबाब आरोपीने दिला आहे. जुन्या व्हिडिओने गुन्हेगाराची आणि गुन्ह्याच्या क्रूरतेची ओळख पटवून दिली आहे. खुनाच्या गुन्ह्यात वापरलेली कार आणि डोक्यात घातलेले लोखंडी हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे.आखाडा बाळापूर येथील शेख शकील शेख खाजा यांचा खून १ मार्च रोजी रात्री झाला होता. यानंतर मयताच्या बहिणीने तक्रार दिल्यानंतर मयताची पत्नी फुलमां शेख, व तिचा प्रियकर मोहसीन खान हरून खान पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दोघांनाही अटक करून न्यायालयापुढे सादर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.कोठडीत असताना पोलिसांनी आरोपींना बोलते केले आहे. या खूनाच्या घटनेत आणखी दोघांचा सहभाग असल्याचे आरोपीने सांगितले आहे.आरोपी मोहसीन याच्या सोबत इतर दोघेजण या गुन्ह्यात सहभागी आहेत. एक डोंगरकडा येथील चालक शैलेश असून दुसरा गोपाळ नावाचा याच भागातील बाजूच्या खेडेगावातील गाडी चालक असल्याचे सांगितले. त्या दोघांचाही पोलिसांनी शोध घेतला असता दोघेही फरार असल्याचे ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांनी सांगितले.सहा महिन्यापूर्वी याच आरोपींनी शेख शकील यास अमानुष मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ तयार करण्यात आला असून अत्यंत क्रूरपणे त्याचा छळ केल्याचे दृश्य त्यात दिसत आहे. पोलिसांनी आरोपीला विचारपूस करताना बोलते केले असता खाक्या दाखवताच पोपटासारखा आरोपी बोलू लागला. त्याने घटना सांगितली असून मारहाण आणि खून कसा केला याबाबतचा जबाब पोलिसांना दिला आहे.दरम्यान, या घटनेत वापरण्यात आलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. शेख शकील याच्या डोक्यात वार केलेला लोखंडी पाना पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणात आणखी दोन आरोपींची संख्या वाढल्याने हे प्रकरण गुंतागुंतीचे बनले आहे. मारहाणीचा आरोपीच्या मोबाईल मधील व्हिडिओ पोलिसांना मोठा आधार बनणार आहे. कारण सहा महिन्यापासून सातत्याने आरोपीचे मयताच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवत पतीला क्रूरपणे मारहाण करीत होते. मयताच्या गुप्तांगात मिरची टाकून केलेली केलेली अमानुष मारहाण व्हिडिओ मधून स्पष्ट दिसत आहे.हा व्हिडिओच पोलिसांसाठी सबळ पुरावा ठरला आहे.