राज्यातील कफ सीरप कंपन्या चौकशीच्या फेऱ्यात; ८४ कंपन्यांची चौकशी सुरू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 4, 2023

राज्यातील कफ सीरप कंपन्या चौकशीच्या फेऱ्यात; ८४ कंपन्यांची चौकशी सुरू

https://ift.tt/D5hrfsg
मुंबई : राज्यातील कफ सीरप बनविणाऱ्या ८४ कंपन्यांची औषध प्रशासनातर्फे चौकशी सुरू असल्याची माहिती राज्याचे औषध प्रशासनमंत्री यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. देशातून निर्यात झालेल्या सदोष कफ सीरपमधील हानिकारक घटकांमुळे ६६ मुलांचा मृत्यू झाल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत चार कंपन्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, सहा कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत; तर जवळपास १७ दोषी कंपन्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली आहे, असे राठोड यांनी नमूद केले. दरम्यान, हे प्रकरण गंभीर असून, अशा कंपन्यांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्याची सूचना तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिली.राज्यात एकूण ९९६ अॅलोपॅथिक उत्पादक आहेत. त्यापैकी ५१४ उत्पादक निर्यात करतात. गेल्या वर्षभरात आठ हजार २५९ किरकोळ विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली असून, दोन हजार परवानाधारकांना कारणे दाखवा, ४२४ परवाने रद्द; तर ५६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे राठोड यांनी सांगितले. याबाबत लवकरच एक बैठक घेतली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह आमदार योगेश सागर, जयकुमार रावळ यांनी भाग घेतला.