सलग २१ दिवस दररोज दोन झाडांचं वृक्षारोपण, दिवसातून पाच वेळा नमाज पठण,न्यायालयानं सुनावली अनोखी शिक्षा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, March 1, 2023

सलग २१ दिवस दररोज दोन झाडांचं वृक्षारोपण, दिवसातून पाच वेळा नमाज पठण,न्यायालयानं सुनावली अनोखी शिक्षा

https://ift.tt/lxRdW56
नाशिक : मालेगावमधील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयानं २०१० च्या एका प्रकरणात ३० वर्षीय मुस्लीम युवकाला दोषी ठरवत मशिदीच्या परिसरात दररोज दोन झाडं लावण्यास आणि दिवसातून पाच दिवस नमाज पठण पुढील २१ दिवस करण्याचे आदेश दिले. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी तेजवंत सिंघ संधू यांनी रौफ खान याला दोषी ठरवलं मात्र दुसऱ्या प्रकरणातून निर्दोष मुक्त केलं होतं. यानंतर रौफ खान यानं केवळ २१ दिवस नाही तर संपूर्ण आयुष्यभर नमाज पठण करेन, असं म्हटलं. मालेगावातील मोहम्मद शरीफ शेख यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात एक तक्रार नोंदवली होती. मोहम्मद शेख त्यांच्या मित्राला क्रांती नगर भागात भेटण्यासाठी २८ एप्रिल २०१० ला गेले होते. शेख यांनी पोलिसांना सांगितलं की त्यांनी त्यांची गाडी पार्क केली होती. मात्र, नंतर त्या गाडीला रौफ खानच्या रिक्षानं धक्का दिला होता. आमच्या घराबाहेर गाडी पार्क का केली अशी विचारणा करत रौफ खान यानं मारहाण केल्याची तक्रार मालेगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयानं चार साक्षीदारांचा जबाब नोंदवला. या प्रकरणाचा निकाल देताना रौफ खान याला दोन झाडं मशीद परिसरात लावण्यास सांगण्यात आलं आहे. झाड लावली जातात की नाही याची पडताळणी करण्याचे आदेश न्यायालयानं कृषी अधिकाऱ्यांना दिली आहे. वकील नसरीन मेमन यांनी रौफ खान याला २१ दिवस दिवसातून ५ वेळा नमाज पठण करण्याचे आदेश न्यायालयानं दिल्याचं म्हणाले. न्यायालयानं दोषी व्यक्तींना सुधारण्याच्या दृष्टीनं दिलेला निकाल महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. न्यायालयाकडून कृषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली असून झाडं लावली जातात की नाही याची नोंद ठेवली जाणार आहे.अनोख्या शिक्षेची चर्चा नाशिकच्या मालेगावमधील अनोख्या शिक्षेची सगळीकडे चर्चा सुरु आहे. न्यायाधीशांना आरोपीला सुधारण्याच्या हेतूनं ही शिक्षा दिली आहे. आरोपीनं देखील शिक्षा मान्य करत आयुष्यभर नमाज पठण करणार असल्याचं म्हटलं.