नागपुरात भंडारा रोडवर मसाल्याला बसला तडका, शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला भीषण आग - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 12, 2023

demo-image

नागपुरात भंडारा रोडवर मसाल्याला बसला तडका, शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला भीषण आग

https://ift.tt/qKxw9yk
photo-98576065
नागपूर : नागपूरमध्ये मोठी घटना घडली आहे. नागपूर भंडारा रोडवर ही घटना घडली. भंडारा रोडवर एका ट्रकला ( MH 30 BD 4422) अचानक भीषण आग लागली. या बर्निंग ट्रकचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. विशेष म्हणजे शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रकला आग लागल्याचे चालकाच्या वेळीच लक्षात आले. आणि तो ट्रकमधून उतरला. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे.नागपूर भंडारा रोडवर बर्निंग ट्रकचा थरार बघायला मिळाला. ट्रकमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही भीषण आग लागली. हा ट्रक मसाले (तेजपान) घेऊन जात होता. याच दरम्यान शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ट्रॅकला भीषण आग लागली. संबंधित घटना ही भंडारा रोड, सुरूची मसाले कंपनी, उमिया धाम, नाका नं. ०५ येथे घडली. या घटनेत सुदैवाने चालक आणि त्यासोबत असणाऱ्या एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांनी ट्रकमधून लगेच उडी मारल्याने ते बचावले. हा ट्रक मसाले घेऊन जात होता. शॉर्ट सर्किटमुळे ट्रॅकला भीषण आग लागली. बघता बघता आगीत मसाल्याचे पोते आणि ट्रक जळू लागल्याने चालकाने वेळीच ट्रक उभा केला. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला कळवण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पण अग्निशमन दलाचे पथक दाखल होईपर्यंत ट्रकचे केबिन जळून खाक झाले होते. आगीच्या घटनेमुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यात ट्रकचे आणि मालाचे मोठे नुकसान झाले आहे.

Pages