तो मित्रांसोबत हॉटेलच्या खोलीत गेला, चेक आऊटनंतर पुन्हा एकटाच परतला, घडले धक्कादायक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 14, 2023

तो मित्रांसोबत हॉटेलच्या खोलीत गेला, चेक आऊटनंतर पुन्हा एकटाच परतला, घडले धक्कादायक

https://ift.tt/ZQ3JUkP
: राजधानी दिल्लीतील ओयो हॉटेलच्या खोलीत एका तरुणाने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. हा तरुण त्याच्या मित्रासह हॉटेलमध्ये आला होता. २३ वर्षीय राहुल असे या २३ वर्षीय मृत तरुणाचे नाव असून तो दक्षिण पुरी एक्स्टेंशन येथे राहणारा होता. या तरूणासोबत त्याचा सौरव नावाचा मित्र होता. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुल त्याच्या मित्रासोबत १२ मार्च रोजी सकाळी हॉटेलमधून चेक आऊट करून निघून गेला होता. संध्याकाळी तो पुन्हा एकटाच हॉटेलमध्ये आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.परवाना नसतानाही सुरू होते हॉटेलदिल्ली पोलिसांनी सांगितले की, ओयो हॉटेलच्या रुम क्रमांक १०१ मध्ये एका तरुणाने गळफास घेतल्याची माहिती मिळाली होती. तरूणाचा फाशी घेतल्याने मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात हे हॉटेल गेल्या एक वर्षापासून वैध परवान्याशिवाय सुरू असल्याचे आढळून आले. या दुमजली हॉटेलमध्ये १६ खोल्या आहेत. चौकशीदरम्यान राहुल त्याचा मित्र सौरव याच्यासोबत हॉटेलमध्ये पोहोचल्याचे समोर आले. दोन्ही मित्रांनी १२ मार्चला सकाळी चेकआऊट केले होते. यानंतर राहुल संध्याकाळी एकटाच हॉटेलमध्ये परतला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी एम्समध्ये पाठवला. यानंतर तरुणाच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली.बनावट हवालदार हॉटेलमध्ये पोहोचलेसीसीटीव्ही फुटेज तपासत असताना पोलिसांना एका नव्या प्रकरणाची माहिती मिळाली. हॉटेलच्या कर्मचार्‍यांकडे चौकशी केली असता महिलेसोबत हॉटेलच्या रुम क्रमांक २०६ मध्ये एक पोलिस कर्मचारी राहत असल्याचे आढळून आले. त्याने आपले नाव नबाब सिंग असल्याचे सांगितले. तो अशोक नगर येथील रहिवासी होता. हा माणूस पोलिसांच्या गणवेशात आला होता. तपासादरम्यान तो ओळखपत्र दाखवू शकला नाही. नंतर तो शाहदरा येथील नागरी संरक्षण स्वयंसेवक असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी खोटी ओळख सांगितल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.