
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी ते सांताक्रुझदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकवेळेत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)स्थानक : माटुंगा ते मुलुंडमार्ग : अप आणि डाऊन जलदवेळ : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५पर्यंतपरिणाम : ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकलफेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून, इतर फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.हार्बर रेल्वेस्थानक : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेमार्ग : अप आणि डाऊनवेळ : सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०पर्यंतपरिणाम : सीएसएमटी/वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेल आणि सीएसएमटी ते गोरेगाव/वांद्रेदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. मात्र, पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.पश्चिम रेल्वेस्थानक : जोगेश्वरी ते सांताक्रुझमार्ग : पाचवी मार्गिकावेळ : सकाळी १० ते दुपारी ३पर्यंतपरिणाम : रविवार ब्लॉकमुळे काही लोकलफेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत, तर काही विलंबाने धावणार आहेत.