प्रवाशांचा प्रवास जलद होणार; दहिसर-मिरा मेट्रो मार्गिका उत्तनपर्यंत नेणार, पण अद्याप... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, April 24, 2023

प्रवाशांचा प्रवास जलद होणार; दहिसर-मिरा मेट्रो मार्गिका उत्तनपर्यंत नेणार, पण अद्याप...

https://ift.tt/VqXnUYb
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई/ म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदरः दहिसरला मिरा-भाईंदरशी जोडणाऱ्या मेट्रो ९ मार्गिकेच्या विस्ताराचा बृहत प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार नसताना विस्ताराची तयारी मात्र प्रशासनाने सुरू केली आहे. ही मार्गिका उत्तनपर्यंत आणण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली.मेट्रो ९ ही दहिसर पूर्व ते भाईंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियमपर्यंत आहे. ११.३८ किमी लांबीच्या या उन्नत मार्गिकेवर आठ स्थानके आहेत. मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या ८४० खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. तर मार्गिकेचे काम सरासरी ५० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र अद्याप प्रकल्पासाठीच्या कारशेडचा विषय मार्गी लागलेला नाही.मूळ आराखडा व नियोजनात कारशेड राई गावात होणार होती. नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियम या अंतिम स्थानकापासून ही जागा तीन किमी अंतरावर होती. पण ग्रामस्थ जमीन देण्यास तयार नसल्याने आता आणखी चार किमी पुढे जाऊन उत्तन येथे कारशेड उभारणीचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र अंतिम स्थानक ते उत्तन ही मार्गिका नेमकी कशी असेल, त्यासाठी किती जमीन लागेल, त्याचा खर्च किती असेल, यासंबंधीचा बृहत प्रकल्प आराखडाच नाही. त्यामुळे हे मार्गिकेच्या विलंबाचे कारण ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सरकारकडे अभ्यास अहवाल पाठवलाया विस्ताराचा डीपीआर नेमका कधी तयार होणार, याबाबत एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर श्रीनिवास यांच्याशी ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने संवाद साधला असता त्यांनी, यासंबंधी सरकारकडे अभ्यास अहवाल आधीच पाठवला असल्याचा दावा केला. विस्तारासाठी आवश्यक एकूण जमिनीपैकी अधिकाधिक सरकारी जमीन असेल. यासंदर्भात अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र डीपीआरबाबत त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही.सरकारी जागेची मोजणीडीपीआर नसला, तरी प्रशासनाने त्या भागातील जमीन मोजणी सुरू केली आहे. ठाणे जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत मिरा गाव तहसीलदार कार्यालयाने उत्तन येथे सरकारी जमिनीलगतच्या घरांना मोजणीसाठी या आधीच नोटिसा बजावल्या होत्या. त्यानुसार जमिनीची मोजणीदेखील झाली आहे.