काम करताना खाली पडला, थरथर कापू लागला अन् क्षणात मृत्यू, CCTV फुटेज पाहून अंगावर काटा येईल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, April 21, 2023

काम करताना खाली पडला, थरथर कापू लागला अन् क्षणात मृत्यू, CCTV फुटेज पाहून अंगावर काटा येईल

https://ift.tt/kNOJp7v
भागलपूर: कोणाला कधी, कुठे आणि कसा मृत्यू येईल हे कोणीही सांगू शकत नाही. हेच दाखवणारा एक सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल बोतो आहे. काम करत असताना एका तरुणाचा अचानक मृत्यू झाला आहे. ही घटना तिथल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. प्रकरण बिहारच्या भागलपूरचे आहे. येथे खोलीतील माळ्यावर काम करणारा सोनार अचानक बेशुद्ध पडला. त्याचं शरीर थरथर कापू लागलं आणि काहीच वेळात त्याचा मृत्यू झाला. पिंटू कुमार असे या मृत सोनार कारागिराचे नाव आहे, तो कोलकाता येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईलपिंटू हा सोन्याचा व्यापारी विकेश कुमार यांच्याकडे गेल्या दोन वर्षांपासून राहत होता आणि तिथेच काम करायचा. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी कारागिराचा मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरु केला आहे. पोलिसांनी मृतदेह मायागंज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या शवविच्छेदन अहवाल येणे बाकी आहे. अहवालानंतर कारागिराचा मृत्यू कशाने झाला हे सांगता येईल, असं पोलिसांनी सांगितलं. सीसीटीव्ही फुटेज पाहून सर्वांनाच धक्का बसलाबुधवारी (१९ फेब्रुवारी) सकाळी ही घटना घडली असून जेव्हा या कारागिराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला तेव्हा सार्वांना आश्चर्याचा धक्का बसला. जेव्हा त्याच्या मृत्यूचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं ते पाहून सारेच हादरले. पिंटू हा माळ्यावर बसून काही काम करत असल्याचे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते. दरम्यान, तो अचानक कोसळला. खाली पडल्यानंतर त्यांचं अंग थरथर कापू लागलं आणि काहीच क्षणात त्याचा मृत्यू झाला. कोणी काही करु शकेल त्याआधीच त्याचा जीव गेला होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला असू शकतो, असंही तेथे उपस्थित काही लोकांचे म्हणणे आहे. शवविच्छेदन अहवालातूनच मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.