दूरदर्शनच्या लोकप्रिय न्यूज अँकर गीतांजली अय्यर यांचे निधन, कायम आठवणीत राहील त्यांचा आवाज - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 8, 2023

दूरदर्शनच्या लोकप्रिय न्यूज अँकर गीतांजली अय्यर यांचे निधन, कायम आठवणीत राहील त्यांचा आवाज

https://ift.tt/Mi8CKef
नवी दिल्ली: दूरदर्शनच्या पहिल्या इंग्रजी न्यूज अँकरपैकी एक गीतांजली अय्यर यांचे बुधवारी निधन झाले. मृत्युसमयी त्या ७२ वर्षांच्या होत्या. गीतांजली अय्यर यांनी ३० वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनवर अँकरिंग केले. १९७१ मध्ये त्या दूरदर्शनशी जोडल्या गेल्या. त्यांच्या अनेक दशकांच्या कारकिर्दीत त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार मिळाला.गीतांजली होत्या प्रतिभावानगीतांजली अय्यर यांनी इंग्रजी भाषेत अंडर ग्रॅज्युएशनची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी कोलकाता येथील लोरेटो कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. गीतांजली यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून डिप्लोमाही केला आहे.टीव्ही न्यूज इंडस्ट्रीची स्टार एकेकाळी गीतांजली अय्यर, मीनू तलवार, नीती रवींद्रन आणि सलमा सुलतान या टीव्ही न्यूज इंडस्ट्रीतील स्टार्स होत्या. हा केबलच्या आधीचा काळ होता. त्या काळात दूरदर्शन हे जगाच्या बातम्या जाणून घेण्याचे एकमेव माध्यम होते.नंतर मार्केटिंगच्या जगात प्रवेश दूरदर्शनमध्ये न्यूज अँकर म्हणून यशस्वी कारकीर्दीनंतर, गीतांजली यांनी कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंगच्या जगात प्रवेश केला. त्या उद्योग संघटना CII च्या सल्लागारही होत्या. त्यांनी 'खानदान' या मालिकेतही काम केले होते.अनेक जाहिरातींचा चेहरा त्या काळात त्या एक प्रसिद्ध चेहरा होत्या. न्यूज अँकरिंग व्यतिरिक्त, त्या जाहिरात क्षेत्रात सक्रियपणे दिसल्या. गीतांजली यांनी त्या काळातील अनेक ब्रँडसाठी काम केले.गीतांजली त्या काही मोठ्या अँकरपैकी एक होत्या गीतांजली त्या काळातील काही महिला अँकरपैकी एक होत्या. त्यांच्या या जगातून निघून जाण्याने पत्रकारिता विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा तो आवाज मात्र लोक नेहमी लक्षात ठेवतील.