Mumbai AC Local : मबईतल एस लकलमधय फकटयच गरद पसधरक तरसत रलवकड मठ मगण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 17, 2023

Mumbai AC Local : मबईतल एस लकलमधय फकटयच गरद पसधरक तरसत रलवकड मठ मगण

https://ift.tt/InJ7qLd
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वेच्या एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढती आहे. दिवा स्थानकातून तिकीट-पासधारकांना एसी लोकलमध्ये प्रवेश करता येत नाही. तिकीट तपासनीस नसल्याने विनातिकीट प्रवासी मात्र दमदाटी करून डब्यात प्रवेश करतात. यामुळे एसी लोकलच्या अधिकृत प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान सकाळी ७ ते ११ या वेळेत एक आणि दुपारी १२ वाजेपर्यंत चार धावतात. सकाळी नऊची टिटवाळा-सीएसएमटी एसी लोकल घुसखोरांमुळे हुकली तर दुसरी एसी लोकल थेट साडेअकरा वाजता येते. दिव्यातून थेट जलद लोकल नसणे आणि एसी लोकलच्या अत्यंत तोकड्या फेऱ्या यांमुळे दिवेकरांना या सेवेचा लाभ घेता येत नाही. दिवा स्थानकात फलाट उपलब्ध असूनही येथून जलद लोकल सुटत नाही. यामुळे कल्याणवरून येणाऱ्या जलद लोकलचा पर्याय दिव्यातील रेल्वे प्रवाशांना आहे. ऑगस्ट २०२२मध्ये दहा एसी लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या होत्या. मात्र कळवा स्थानकात आंदोलन झाल्याने या लोकल फेऱ्या रद्द झाल्या. एसी लोकलच्या फेऱ्या वाढवा किंवा दिव्यातील घुसखोरांवर अंकुश ठेवा, अशी मागणी मानसी देशपांडे या तरुणीने केली. प्रथम श्रेणीपेक्षा अधिक तिकीट-पासदर एसी लोकलचे आहेत. मात्र विनातिकीट प्रवासी फुकट एसीचा आनंद घेतात. समाजमाध्यमांवर अनेक तक्रारी केल्यावर केवळ साचेबद्ध उत्तरे मिळतात. यावर उपाय कोण करणार, असा प्रश्न प्रवासी निलेश माने यांनी उपस्थित केला आहे. ठाणे स्थानकासह घाटकोपर, कुर्ला, दादर स्थानकांवर तिकीट तपासनीसांकडून नियमित तपासणी करण्यात येते. गर्दीच्या वेळेतदेखील एसी लोकलमध्ये सातत्याने तपासणी करून विनातिकीट प्रवाशांना जागेवरच दंड ठोठावण्यात येतो, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासन काय कठोर कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रवाशांची या त्रासापासून कधी सुटका होणार हे रेल्वेच्या कारवाईवर अवलंबून असेल.