दन महनयपरव लगन; पण पतनच एक गषट खटकल तल खलत बद करन पतच भयकर कतय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 2, 2023

दन महनयपरव लगन; पण पतनच एक गषट खटकल तल खलत बद करन पतच भयकर कतय

https://ift.tt/kgYumKb
सोनीपत: पत्नीने वेळेवर चपाती न केल्याच्या रागातून एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. हरियाणातील सोनीपतमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मृतक हा गावातच भाड्याच्या घरात राहत होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, यूपीतील सहारनपूरचा रहिवासी अहताशम कामाच्या शोधात सोनीपतला आला होता. सोनीपतच्या शिवली गावात तो पत्नीसोबत भाड्याने राहत होता. अहतशामचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. तो सोनीपत येथील एका कारखान्यात काम करायचा. दुपारी तो घरी जेवायला गेला. मात्र, त्याची पत्नी घरातील कामात व्यस्त होती. तिने वेळेवर जेवण बनवलं नाही. याचा राग अहतशामला आला.पत्नीला खोलीत बंद केलं, दुसऱ्या खोलीत गळफास घेतलाअहतशामने पत्नीला खोलीत कोंडून दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतकाचे कुटुंबीय मोहम्मद अस्लम सांगतात की, अहताशमचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्याची पत्नी घरातील कामात व्यस्त होती, तिला वेळेवर जेवण बनवता आले नाही, यामुळे त्याने पत्नीला एका खोलीत बंद केलं आणि दुसऱ्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.हेड कॉन्स्टेबल प्रीतम यांनी सांगितले की, शिवली गावात भाड्याच्या घरात राहणाऱ्या अहतशामने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतक हे कारखान्यात काम करायचे. त्याची पत्नी घरातील कामात व्यस्त होती. वेळेवर जेवण बनवता येत नव्हते. त्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.