Property Auction :सवसतत परपरट खरद करणयच गलडन सध; तमहल फकत ह गषट करव लगल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 9, 2023

Property Auction :सवसतत परपरट खरद करणयच गलडन सध; तमहल फकत ह गषट करव लगल

https://ift.tt/cDzLukq
नवी दिल्ली: जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. स्वस्तात जमीन, दुकाने आणि घरांची विक्री करणार आहे. सरकारी मालकीची ही कंपनी मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टीचा लिलाव करणार आहे. या लिलावात सहभागी होऊन तुम्ही देखील स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करू शकता. पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बॅक देशातील विविध ठिकाणच्या प्रॉपर्टीची विक्री करणार आहे. ही विक्री ई-लिलावाच्या माध्यमातून होणार आहे. यात रहिवासी घर, व्यवसाइक, शेत जमीन, सरकारी प्रॉपर्टी आणि औद्योगिक प्रॉपर्टीचा समावेश आहे. बँकेच्या या मेगा ई-लिलावात कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. बँकेने याची माहिती वेबसाइटवर दिली आहे. यानुसार लिलावात ११ हजार ३७४ रहिवासी घरे, २ हजार १५५ व्यवसाइक, १ हजार १३३ व्यवसाइक, ९८ शेत जमीन, ३४ सरकारी आणि ११ बँक प्रॉपर्टी खरेदीसाठी उपलब्ध असतील. या सर्व प्रॉपर्टी डिफॉल्ट लिस्टमध्ये आहेत. कधी होणार लिलावप्रॉपर्टीसाठीचा एक लिलाव बँकेने ६ जुलै रोजी केला आहे. आता २० जुलै रोजी मेगा ई-लिलाव होणार आहे. बँकेने ट्विट करून याची माहिती दिली आहे. या लिलावात स्वस्ताता प्रॉपर्टी खरेदी करता येईल. कोण आणि कशी बोली लावू शकतेई-लिलावात भाग घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत केवायसीची कागदपत्रे दाखवावी लागतील. त्याच बरोबर तुमच्या प्रॉपर्टीचे अनेस्ट मनी देखील जमा करावी लागले. केवायसी आणि ईएमडीनंतर अर्ज करणाऱ्यास ई-मेल आयडीवर लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळेल. याचा वापर करून युझर्सला लिलावात भाग घेता येईल.