Thane News: घडबदर रडवरल वहतकत बदल वहनन 'य' तरखपरयत बद; करण... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 10, 2023

Thane News: घडबदर रडवरल वहतकत बदल वहनन 'य' तरखपरयत बद; करण...

https://ift.tt/7tJHRdQ
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : 'वडाळा - ठाणे - कासारवडवली' या मेट्रो चार प्रकल्पाचे काम शहरात प्रगतिपथावर आहे. या कामादरम्यान मानपाडा ते कापूरबावडी येथे गर्डर टाकण्याचे काम येत्या १८ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे रात्री ११.५५ ते पहाटे ५ या वेळेत पाच तासांचा विशेष ब्लॉक या काळात घेतला जाणार आहे. या वेळेत अवजड वाहनांना या मार्गावर प्रवास करण्यास ठाणे वाहतूक शाखेने बंदी घातली आहे. अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वाहतूक करावी लागणार असल्याने या मार्गावर कोंडीची भीती वर्तवली जात आहे. घोडबंदर रोडवर जागोजागी मेट्रोच्या स्थानकांच्या उभारणीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. याच मार्गावरून दररोज हजारो अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे प्रवेशबंदीच्या काळात अवजड वाहने कापूरबावडी येथून भिवंडी, कशेळीमधून वळविण्यात आली आहेत. तसेच मुंब्रा, कळवा येथून घोडबंदर रोडकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी करत ही वाहने गॅमनमार्गे खारेगाव खाडी पुलाखालून खारेगाव टोलनाका माणकोली अंजूर फाटामार्गे मार्गस्थ केली जाणार आहेत.दरम्यान, तुंगारेश्वर अभयारण्याखालील जल बोगद्याचे महत्त्वाकांक्षी काम मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्ण केले आहे. सूर्या प्रादेशिक जलपुरवठा योजनेतील हा बोगदा असून त्यातील पाण्याचा लाभ मिरा-भाईंदर व वसई-विरार महापालिका क्षेत्राला होणार आहे.