गुगलमुळे आता यूजर्सना व्हाइट हाऊसची सफर घडणार; खास अपडेट आणलं, जाणून घ्या सविस्तर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 30, 2023

गुगलमुळे आता यूजर्सना व्हाइट हाऊसची सफर घडणार; खास अपडेट आणलं, जाणून घ्या सविस्तर

https://ift.tt/mgJj4GI
लक्ष्मीकांत मेजारी:गुगल आपल्या यूजर्ससाठी नवनवीन अपडेट्स आणतच असते. गुगलने आतापर्यंत विविध शहरांची, ठिकाणांची आभासी सफर घडवून आणलेली आहेच. पण गुगलच्या माध्यमातून एखाद्या ऐतिहासिक वास्तूची सफरही आपल्याला घडू शकेल असे तुम्हाला वाटले होते का? पण, गुगलमुळे आता यूजर्सना एका जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूची मोफत सफर घडणार आहे. ही ऐतिहासिक वास्तू आहे, व्हाइट हाउस. गुगलचे जगभरात कोट्यवधी यूजर्स आहेत. गुगल त्यांच्यासाठी वारंवार नवनवीन सेवा घेऊन येत असते. यावेळीही गुगलने आपल्या यूजर्ससाठी विशेष सेवा आणली आहे. अमेरिकेच्या व्हाइट हाऊसबद्दल सर्वांनाच आकर्षण आहे. अमेरिकेत जाऊन ही वास्तू आपण कधीतरी पाहावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण, सर्वांनाच ते शक्य होत नाही. पण आता टेन्शन घेण्याची गरज नाही. अमेरिकेला न जाताही आता सर्वांना अगदी फुकटात व्हाइट हाऊस पाहता येणार आहे. यासाठी व्हाइट हाऊस आणि गुगलने ही सेवा उपलब्ध करून दिली आहे.व्हाइट हाऊस ही एक ऐतिहासिक इमारत आहे. व्हाइट हाऊसला अमेरिकेच्या अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान म्हटले जाते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक या इमारतीला सहज भेट देऊ शकत नाहीत. तसेच या इमारतीला भेट द्यायची म्हणजे महागडे तिकीट काढून आणि लांबचा प्रवास करून अमेरिका गाठावी लागेल. पण आता घाबरण्याचे कारण नाही. हा एवढा मोठा द्राविडी प्राणायाम न घालता आभासी पद्धतीने यूजर्स घरी बसून व्हाइट हाउसला भेट देऊ शकतात. गुगल मॅप्स आणि गुगल आर्ट्स अँड कल्चरने व्हाइट हाउसच्या सहकार्याने ही व्हर्च्युअल टूर सुरू केली आहे.या दौऱ्याबद्दल बोलताना फर्स्ट लेडी जिल बिडेन यांच्या कम्युनिकेशन डायरेक्टर म्हणाल्या की, ‘प्रत्येकजण व्हाइट हाऊसला भेट देण्यासाठी वॉशिंग्टन डीसीला जाऊ शकत नाही, हे लक्षात घेऊन आमच्या प्रशासनाच्या पहिल्या दिवसापासून, फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी ‘पीपल्स हाऊस’ अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञान आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून व्हाइट हाउसचे दरवाजे व्यापक प्रमाणावर खुले करण्याबाबत काम केले,’ असे या व्हर्चुअल सफरीबाबत माहिती देताना, जिल बायडेन यांच्या संपर्क संचालकांनी माहिती देताना सांगितले. व्हाइट हाउसची व्हर्चुअल सफर करण्यासाठी https://ift.tt/2RGU6Ck या लिंकवरून करू शकता. या संपूर्ण दौऱ्याची माहिती देण्यासाठी इंग्रजी भाषेचा वापर करण्यात आला आहे. यासाठी गुगलने आपल्या स्ट्रीट व्ह्यू तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. याच्या मदतीने त्याच्या सर्व खोल्यांची प्रतिमा कॅप्चर करण्यात आली आहे.