हवेची गुणवत्ता खालावली; पालिकेचे मार्गदर्शक तत्व जारी, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 9, 2023

हवेची गुणवत्ता खालावली; पालिकेचे मार्गदर्शक तत्व जारी, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

https://ift.tt/pvMHjs1
ठाणे: मुंबईसह आजूबाजूच्या शहरातील खालावल्यानंतर ठाणे पालिका प्रशासनाने शहरात हवेची गुणवत्ता कायम राखण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग समित्यांनी भरारी पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून पाहणी आणि कारवाईस सुरूवात केली. या पथकांनी सायंकाळपर्यंत नियमावलीचे उल्लंघन करणार्‍या ३६२ जणांना नोटीसा बजावल्या आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण एक लाख ७० हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे आनंद नगर चेक नाका येथे तैनात असलेल्या नौपाड्यातील पथकाने बांधकामाच्या राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या २१ डंपर्सवर दंडात्मक कारवाई करुन एक लाख पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला. माजिवडा प्रभाग समिती अंतर्गत प्रदूषणकारी आरएमसी प्लांट बंद करण्यात आला.तर शहरात सुरू असलेली बांधकामे, बायोमास जाळणे, राडोरोड्याची वाहतूक यांना नियमावलीचे पालन करण्यासाठी नोटीसाही बजावल्या.