महाविकास आघाडीचा उमेदवारीसाठी सावध पावित्रा; 'जळगाव' ला ठाकरे, ‘रावेर’चा पेच पवार गटाकडून अद्याप सुटेना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, March 21, 2024

महाविकास आघाडीचा उमेदवारीसाठी सावध पावित्रा; 'जळगाव' ला ठाकरे, ‘रावेर’चा पेच पवार गटाकडून अद्याप सुटेना

https://ift.tt/wM0hde2
म. टा. प्रतिनिधी, जळगावलोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. जळगाव व रावेर मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार सुरु झाला आहे. मात्र, अद्यापही दोन्ही मतदारसंघातील उमेदवार महाविकास आघाडीतर्फे जाहिर करण्यात आलेले नाहीत. कोणत्याही परिस्थितीत भाजपाला निवडणूक सोपी होणार नाही, यासाठी आघाडीने सावध पावत्रा घेतला आहे. गेल्या आठ दिवसांपासून ‘जळगाव’साठी ठाकरे गट तर ‘रावेर’साठी शरद पवार गटांकडून मुंबईत बैठकांवर बैठका सुरु आहेत.जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाच्या वाट्याला आली आहे. मागील आठवड्यात दोन दिवसात उमेदवार जाहीर करण्याची घोषणा करणाऱ्या ठाकरे गटाने भाजपाने विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकट कापून स्मीता वाघ यांना उमेदवारी दिल्याने आपली उमेदवार निश्चिती लांबवली आहे.भाजपातील नाराजांच्या संपर्कात ठाकरे गटस्मीता वाघ यांच्या जमेच्या बाजू तसेच कच्चे दुवे अभ्यासूनच उमेदवार देण्याची रणनिती आखली आहे. ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या माध्यमातून स्वत: उद्धव ठाकरे उमेदवाराची चाचपणी करीत आहेत. ठाकरे गटातून माजी महापौर कुलभूषण पाटील, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने व भाजपातून नुकत्याच ठाकरे गटात आलेल्या अॅड. ललिता पाटील यांची नावे सध्या आघाडीवर आहे. मात्र, या तिघांपेक्षाही भाजपातील तिकीट नाकारलेल्या इच्छुकांच्याही संपर्कात ठाकरे गट आहेत. याबाबत मुंबईत दोन दिवसांपासून बैठका सुरु असून आज बुधवारी संपर्कप्रमुख संजय सावंत जळगावात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत.‘रावेर’चा पेच पवार गटाकडून अद्याप सुटेनाआघाडीकडून शरद पवार गटाकडे रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा आहे. अचानक येथून निवडणुक लढविण्यास आमदार एकनाथ खडसे यांनी नकार दिला आहे. यामुळे निर्माण झालेला पेच अद्याप पवार गटाकडून सुटलेला नाही. भाजपाकडून सून लढत असल्याने खडसेंकडून ही जागा बाय देण्याचा आरोप व पक्षांतर्गत खडसेंवरील टीकेमुळे शरद पवार यांनी सावध पावित्रा घेतला असून सक्षम उमेदवाराचा शोध सुरु केला आहे. येथून जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, तुप्ती बढे यांची नावे चर्चेत असतांना अचानकच भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी इच्छा व्यक्त केल्याने त्यांच्या नावावर सध्या खल सुरु आहे. चार दिवसांपासून यासाठी मुंबईत बैठका सुरु असल्या तरी अद्याप कुणाचेही नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही.