जळगाव-पुणे विमानाचा मार्ग मोकळा, प्रायोगिक तत्वावर २४ आणि २६ मे अशी दोनच दिवस सेवा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 19, 2024

जळगाव-पुणे विमानाचा मार्ग मोकळा, प्रायोगिक तत्वावर २४ आणि २६ मे अशी दोनच दिवस सेवा

https://ift.tt/6rcOgKo
म. टा. प्रतिनिधी, जळगाव : मागील तीन वर्षांपासून जळगाव विमानतळावरून बंद असलेल्या विमानसेवेला मागील महिन्यात हैदराबाद, गोवा येथील उड्डाणांनी प्रारंभ झाला होता. जळगावकरांच्या मागणीनंतर लवकरच पुणे विमानसेवाही सुरू होणार आहे. दि. २४ व २६ मे रोजी प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू केली जाणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ही सेवा नियमित केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.‘फ्लाय ९१’ या कंपनीच्या माध्यमातून प्रस्तावित असलेल्या जळगाव ते पुणे विमानसेवेला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. ही विमानसेवा २४ आणि २६ मे अशी दोनच दिवस चालवण्यात येणार असली, तरी प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन नियमित केली जाऊ शकते. दरम्यान, जळगावहून पुण्याला फक्त सव्वा तासात पोहोचता येणार आहे. प्रवासभाडे दोन हजार रुपयांपर्यंत असणार आहे.

...असे असेल वेळापत्रक

जळगावहून पुण्यासाठी २४ आणि २६ मे रोजी झेपावणाऱ्या विमानाची वेळ आणि तिकीट बुकिंगसाठीची अधिक माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानुसार जळगाव ते पुणे हे विमान दोन्ही दिवस दुपारी २ वाजून १० मिनिटांनी उड्डाण घेईल. त्यानंतर ३ वाजून २५ मिनिटांनी पुण्यात उतरेल. परतीच्या प्रवासाला निघालेले विमान पुण्यात दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी जळगावसाठी उड्डाण घेईल आणि सव्वा तासाने ५.२० वाजता जळगावला उतरेल. रेल्वेसह खासगी बसने प्रवास केल्यानंतर जळगाव येथून पुण्याला जाण्यासाठी किमान आठ तास लागतात. विमानाने प्रवास केल्यानंतर जळगाव ते पुणे हे अंतर फक्त सव्वा तासात पार करता येणार आहे. यातून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. नोकरी, व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने नियमित पुणे ये-जा करणाऱ्या या विमानसेवेचा फायदा होऊ शकणार आहे.