
अहमदाबाद : केकेआरने हैदराबादवर दमदार विजय साकारला आणि त्यांनी आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला. पण या सामन्यात हा सामना चांगलाच रंगतदार अवस्थेत होता आणि कोणत्याही संघाच्या बाजूने झुकला असता. पण त्याचवेळी एक चेंडू असा पडला की, केकेआरच्या विजयासाठी तो एक चेंडू टर्निंग पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले.केकेआरच्या संघाने पहिल्याच षटकात हैदराबादला धक्का दिला. मिचेल स्टार्कने हैदराबादचा सलामीवीर ट्रेव्हिल हेडला दुसऱ्याच चेंडूवर बाद केले. त्यानंतरही स्टार्क थांबला नाही. स्टार्कने एकाच षटकात हैदराबादला दोन धक्के दिले. त्यामुळे केकेआरने पाचव्या षटकातच हैदराबादची ४ बाद ३९ अशीअवस्था केली होती. पण त्यावेळी राहुल त्रिपाठी हा केकेआरच्या संघाच्या मार्गात मोठा अडथळा होता. राहुलला यापूर्वी तिसऱ्या षटकात जीवदान मिळाले होते. त्यामुळे राहुल या जीवदानाचा फायदा उचलत असल्याचे पाहायला मिळत होते. राहुलने अर्धशतक झळकावत हैदराबादची धावसंख्या वाढवायला सुरुवात केली होती.राहुल यावेळी हैदराबादसाठी वेगाने धावा जमवत होता. त्यावेळी हैदराबादकडून एक मोठी चूक घडली आणि त्याचा फटका त्यांना बसला. राहुलला यावेळी चांगली साथ देत होता तो अब्दूल समद. ही जोडी आता मोठी धावसंख्या रचेल, असे वाटत होते. पण १४ व्या षटकात ही गोष्ट घडली. या १४ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूचा सामना अब्दूल करत होता. त्यावेळी अब्दूलने फटका मारला आणि दोन्ही खेळाडूंना एकेरी चोरटी धाव घेण्याचे ठरवले. पण राहुल यावेळी सुरुवातीला जोरात धावला आणि थोड्या वेळाने थांबला. कारण त्याला धावचीत होण्याची भिती वाटली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. कारण अब्दून तोपर्यंत धाव घेण्यासाठी फारच पुढे आला होता, तर राहुल खेळपट्टीच्या मध्यभागी पोहोचला होता. त्यामुळे राहुलला बाद व्हावे लागले. राहुल हा भन्नाट फॉर्मात होता. पण तो जिथे बाद झाला तिथेच हैदराबादच्या धावसंख्येला खीळ बसली आणि त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळेच राहुलची विकेट ही केकेआरच्या विजयासाठी टर्निंग पॉइंट ठरली.केकेआरच्या मिचेल स्टार्कने सुरुवातीला ३ विकेट्स मिळवले होते. पण त्या़नंतरही हैदराबादने १० च्या सरासरीने आपली धावगती राखली होती आणि राहुल हे या गोष्टीचे मुख्य कारण होते. पण राहुल बाद झाला आणि तिथेच हैदाराबाद सामन्यामधून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यानंतर हैदराबाद मोठी धावसंख्या उभारणार नाही, हे स्पष्ट झाले होते.