Fact Check : बनावट डॉक्टरांच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याचा दावा व्हायरल, काय आहे सत्य? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 3, 2024

Fact Check : बनावट डॉक्टरांच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याचा दावा व्हायरल, काय आहे सत्य?

https://ift.tt/2tL6kDo
नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत न्यूज चॅनेल एनडीटीव्हीचा एक रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट कोलकतामध्ये पकडल्या गेलेल्या बनावट डॉक्टरांबाबत आहे. मात्र सोशल मीडिया युजर ही घटना आताची असल्याचं म्हणत व्हिडिओ शेअर करत आहेत. विश्वास न्यूजने या व्हिडिओचा तपास केला असता, पडताळणीत हा व्हिडिओ बनावट असल्याचं समोर आलं. कोलकातामध्ये २०१७ मध्ये बनावट डॉक्टरांच्या रॅकेटचा भांडाफोड झाल्याचा रिपोर्ट आताचा असल्याचं सांगत शेअर केला जात आहे.

व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?

फेसबुक युजर ने २९ मे रोजी हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिलेलं, 'बनावट शिक्षकांनंतर आता बनावट डॉक्टर अलर्ट. कोलकातामध्ये जवळपास ५६० बनावट मेडिकल MBBS, MD डिग्री विकल्या गेल्या. कोठारी इत्यादी सारख्या प्रमुख रुग्णालयांमधून बनावट डॉक्टरांना अटक करण्यात आली. त्यापैकी एकाला राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला. कोलकाता हे आता देशाचे नवे गुन्हे केंद्र बनले आहे.' ()

पडताळणीत काय समोर आलं?

तपासण्यासाठी, विश्वास न्यूजने व्हिडिओ पाहिला, त्यात NDTV या वृत्तवाहिनीचा लोगो दिसतो. कोलकाता+डॉक्टर्स रॅकेट बस्टेड+एनडीटीव्ही सारखे कीवर्डसह Google वर शोधले असता, आम्हाला हा व्हिडिओ वर ९ जून २०१७ रोजी अपलोड केलेला आढळला. यासंबंधित माहिती वर ६ जून २०१७ रोजी आढळली. इतर अनेक न्यूज पोर्टलवरही या प्रकरणाशी संबंधित बातम्या मिळाल्या. द क्विंटच्या १२ जून २०१७ च्या बातमीनुसार, "गेल्या एका महिन्यात पश्चिम बंगालमध्ये बनावट डॉक्टरांच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे आणि आतापर्यंत बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांसह काम करणाऱ्या किमान सात लोकांना अटक करण्यात आली आहे. सीआयडीने म्हटलं, की आणखी ५०० वैद्यकीय व्यावसायिकांची चौकशी सुरू आहे."पडताळणी करताना, विश्वास न्यूजने दैनिक जागरणचं पश्चिम बंगालचे पत्रकार जेके वाजपेयी यांच्याशी संवाद साधला. त्यांनी हे प्रकरण २०१७ चं असल्याचं सांगितलं. असा एकही घोटाळा अलीकडे उघडकीस आलेला नाही. तपासाअंती विश्वास न्यूजने बनावट पोस्ट टाकणाऱ्या 'नीरज झा' या यूजरची चौकशी केली. हा युजर पटनाचा रहिवासी असून त्याचे फेसबुकवर ३५०० हून अधिक फॉलोअर्स आहेत.

निष्कर्ष

विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल झालेली पोस्ट बनावट असल्याचं समोर आलं आहे. कोलकाता येथील बनावट डॉक्टरांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची ही घटना आताची नसून २०१७ ची असल्याचं समोर आलं आहे.