-
जगात प्रत्येक तासाला होणाऱ्या किती मृत्यू होतात, याबाबतची अचंबित करणारी आकडेवारी समोर आल आहे. या आकडेवारीनुसार चीन आणि भारत यासारख्या मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशात प्रत्येक तासाला जीव गमावणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.
-
वर्ल्ड ऑफ स्टॅटेस्टिक्सनुसार चीन आणि भारतात प्रतितासाला मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही 1000 पेक्षा अधिक आहे. चीनमध्ये प्रत्येक तासाला 1,221 लोकांचा मृत्यू होतो. तर भारतात मृतांची ही संख्या प्रतितासाला 1,069 एवढी आहे.
-
या दोन्ही देशांत असलेली कोट्यवधी लोकसंख्या हेच या मृत्यूचे कारण असू शकते. प्रतितासाला सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या देशात अमेरिका तिसऱ्या स्थानावर आहे. या देशात प्रत्येक तासाला 332 लोकांचा मृत्यू होतो.
-
चौथ्या क्रमांकावर नायझेरिया हा देश आहे. इथे प्रत्येक तासाला 313 लोक मृत्युमुखी पडतात. इंडोनेशियात प्रत्येक तासाला 238 लोकांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू होतो. या यादीत इंडोनेशिया पाचव्या स्थानावर आहे.
-
रशियात प्रत्येक तासाला मृत्यू होणाऱ्यांची संख्या 198 आहे. तर जपानमध्ये हा आकडा 180 आहे. ब्राझीलमध्ये प्रत्येक तासाला 167 लोकांचा मृत्यू होतो. जर्मनीत हीच आकडेवरी 108 एवढी आहे. बांगलादेशमध्ये प्रत्येक तासाला मृत्यू होणाऱ्यांची संख्या 105 एवढी आहे.