अमेरिकेत संकट, थेट 1800 हून अधिक विमाने रद्द, विमान वाहतूक ठप्प, तीव्र.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 27, 2025

अमेरिकेत संकट, थेट 1800 हून अधिक विमाने रद्द, विमान वाहतूक ठप्प, तीव्र..

अमेरिकेत संकट, थेट 1800 हून अधिक विमाने रद्द, विमान वाहतूक ठप्प, तीव्र..

अमेरिकेत सध्या कडाक्याची थंडी आहे. मोठ्या भागांमध्ये तीव्र हिवाळी वादळाच्या इशाऱ्यांमुळे अमेरिकेतील अनेक विमान कंपन्यांनी 1, 800 हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. याचा थेट फटका प्रवाशांना बसला. ऐन सुट्टीच्या काळात विमाने रद्द होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विमानतळांवर प्रवाशांची मोठी गर्दीही बघायला मिळतंय. जे विमान उड्डाण करत आहेत ती अत्यंत उशिराने. ग्रेट लेक्सपासून ईशान्येकडील भागापर्यंत धोकादायक हवामान आहे. ज्यामुळे थेट फटका विमानांना बसत आहे. अशा परिस्थितीत उड्डाण करणे म्हणजे अतिशय धोकादायक असल्याचे सांगितले जातंय. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटअवेअरनुसार, संपूर्ण अमेरिकेत शुक्रवारी हजारो विमाने रद्द करण्यात आली तर काही विमाने विलंबनाने सेवा देत आहेत. यामुळे विमानतळाबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी आहे.

सध्या सुट्ट्या असल्याने लोक घराबाहेर मोठ्या प्रमाणात असून त्यांचे फिरण्याचे प्लॅनिंग यामुळे विस्कळीत होत आहे.
1,802 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आणि 22, 349 विमानांना विलंब झाला. राष्ट्रीय हवामान सेवेने आज ‘विंटर स्टॉर्म डेविन’साठी इशारा जारी केला. शनिवार सकाळपर्यंत ग्रेट लेक्सपासून उत्तर मिड-अटलांटिक आणि दक्षिण न्यू इंग्लंडपर्यंत धोकादायक प्रवासाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

अपस्टेट न्यूयॉर्कपासून न्यूयॉर्क शहर आणि लाँग आयलंडसह ट्राय-स्टेट भागापर्यंत शुक्रवार रात्री 8 इंच हिमवृष्टी अपेक्षित आहे. ज्यामुळे उड्डाण करणे शक्य नाही. केनेडी विमानतळ, लाग्वार्डिया आणि डेट्रॉइट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळासारख्या संभाव्यतः प्रभावित भागांतील धोक्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रवाशांना माहिती देण्यात आली. या परिस्थितीमध्ये उड्डाण शक्य नसल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केलंय.

जेटब्लू एअरवेजने 225 उड्डाणे रद्द केली आहेत, जी इतर एअरलाइनच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. पुढील काही दिवस अमेरिकेत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेत सध्या परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून धोका वाढताना दिसत आहे. पुढील काही तास बर्फ पडण्याची शक्यता आहे.  हवामान खात्याने अगोदरच नेमकी परिस्थिती कशी असणार आहे, याची कल्पना दिली आहे.