Cricket : शुबमनला पुन्हा डच्चू, श्रेयस अय्यर कॅप्टन, भुवनेश्वरचं कमबॅक, माजी खेळाडूकडून कुणाला संधी? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 26, 2025

Cricket : शुबमनला पुन्हा डच्चू, श्रेयस अय्यर कॅप्टन, भुवनेश्वरचं कमबॅक, माजी खेळाडूकडून कुणाला संधी?

Cricket : शुबमनला पुन्हा डच्चू, श्रेयस अय्यर कॅप्टन, भुवनेश्वरचं कमबॅक, माजी खेळाडूकडून कुणाला संधी?

बीसीसीआय निवड समितीने मायदेशात होणाऱ्या टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी भारतीय संघाच घोषणा केली. भारताने वर्ल्ड कप साठी संघ जाहीर करण्याबाबत आघाडी घेतली. सूर्यकुमार यादव या स्पर्धेत पहिल्यांदाच भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरणार आहे. त्यामुळे सूर्यासेनेसमोर वर्ल्ड कप ट्रॉफी राखण्याचं आव्हान असणार आहे. या स्पर्धेला अजून बरेच दिवस बाकी आहेत. मात्र टीम मॅनेजमेंटने त्या हिशोबाने तयारीला सुरुवात केली आहे. टीम इंडिया वर्ल्ड कपआधी न्यूझीलंड विरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. भारताची ही वर्ल्ड कपआधी सर्वात शेवटची टी 20i मालिका असणार आहे. त्यामुळे चाहत्यांची या मालिकेत भारतीय संघ आणि खेळाडू कशी कामगिरी करतात? याकडे करडी नजर असणार आहे.

आकाश चोप्राची वर्ल्ड कपसाठी खास टीम

भारताचा माजी फलंदाज आणि समालोचक आकाश चोप्रा याने वैयक्तिक वर्ल्ड कप टीम निवडली आहे. आकाशने या टीममध्ये अशा खेळाडूंना संधी दिलीय ज्यांची बीसीसीायकडून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली नाही. विशेष बाब म्हणजे आकाशने त्याच्या या टीममध्ये शुबमन गिल याचा समावेश केलेला नाही. शुबमनला बीसीसीआयने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संधी दिलेली नाही. आकाशने वर्ल्ड कपसाठी 13 सदस्यीय संघ जाहीर केलाय. आकाशने यासह प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण असणार? हे देखील स्पष्ट केलं आहे.

अशी आहे आकाशची टीम

आकाशने त्याच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पर्यायी संघात ओपनर म्हणून ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल यांना संधी दिली आहे. आकाशने केएल राहुल याचाही समावेश केला आहे. तसेच आकाशने मुंबईकर श्रेयस अय्यर याला त्याच्या संघाचा कर्णधार केला आहे.

3 विकेटकीपर

तसेच आकाशने त्याच्या टीममध्ये तब्बल 3 विकेटकीपरचा समावेश केला आहे. यामध्ये ऋषभ पंत, केएल राहुल आणि जितेश शर्मा यांचा समावेश आहे. तर आकाशने बॉलिंग ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याचा समावेश केला आहे. तसेच कृणाल पंड्या यालाही संधी दिली आहे. कृणाल हा बॉलिंग ऑलराउंडर आहे.

फिरकीची जबाबदारी कुणाला?

आकाशने युझवेंद्र चहल याला संधी दिली आहे. चहल 2023 पासून टीम इंडियातून बाहेर आहे. तसेच आकाशने वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर यांची निवड केली आहे. तसेच आकाशने मोहम्मद शमी यालाही त्याच्या पर्यायी संघात स्थान दिलं आहे.

टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आकाश चोप्रा याने निवडलेली दुर्लक्षित खेळाडूंची टीम : यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत, जीतेश शर्मा, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार.