Heavy Rain Alert : अतिमुसळधार पाऊस येणार, 48 तासांसाठी अलर्ट, या राज्यांवर मोठं संकट.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 5, 2025

Heavy Rain Alert : अतिमुसळधार पाऊस येणार, 48 तासांसाठी अलर्ट, या राज्यांवर मोठं संकट..

Heavy Rain Alert : अतिमुसळधार पाऊस येणार, 48 तासांसाठी अलर्ट, या राज्यांवर मोठं संकट..

राज्यात गारठा सकाळी जाणवत आहे. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांच्या तुलनेत थंडी कमी झाली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. सातत्याने हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच पुढील चार दिवस राज्यात गारठा कमी जाणवणार असल्याचा अंदाज आहे. उत्तरेकडून प्रदेशात थंडी वाढताना दिसत आहे. डिसेंबर महिनाभर थंडी राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील काही जिल्ह्यात पारा 10 अंशांच्या खाली जाताना दिसतोय. राज्यात एकीकडे थंडी तर एकीकडे पाऊस अशी स्थिती निर्माण झाली. मॉन्सून जाऊन कित्येक महिने झालेले असताना देखील देशातून पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाहीये. यंदाचा पावसाळा अद्भुत राहिला आहे, देशभरात मुसळधार पाऊस पडला आहे. अनेक राज्यांमध्ये पाऊस इतका झाली की, अनेक विक्रम मोडले. महाराष्ट्रातही अनेक भागात इतका पाऊस झाला की, अतिवृष्टी आली.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा आहे. 10 अंशांच्या खाली पुन्हा पारा गेला. पहाटे धुक्यासह थंडी वाढलीये. रत्नागिरीत 34.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवस थंडी कायमच राहण्याची शक्यता आहे. राज्यात चार दिवसांनंतर पुन्हा एकदा थंडीची वाट येण्याची शक्यता आहे. काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील 48 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. केरळमध्ये मॉन्सून दाखल झाल्यापासून ते आतापर्यंत सतत पाऊस पडताना दिसत आहे. केरळमधील हवामान सुधारण्याचे नाव घेत नाही. सतत पाऊस आणि विजांचा कडकडाट बघायला मिळत आहे. आता परत एकदा भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये इशारा जारी केला आहे.

आंध्र प्रदेशात अजूनही पाऊस पडत आहे. हवामान खात्याने पुढील 48 तासांत आंध्र प्रदेशच्या किनारी भागात मुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिला आहे. हवामान खात्याने 48 तासांसाठी तामिळनाडू, तेलंगणातील काही भागात आणि कर्नाटक, लक्षद्वीप, पुद्दुचेरी, कराईकल, माहे, यानम आणि रायलसीमा येथे मुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिला आहे.