Raj Thackeray : मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, NCRB ची आकडेवारी देत राज ठाकरेंचा सावल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 14, 2025

Raj Thackeray : मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, NCRB ची आकडेवारी देत राज ठाकरेंचा सावल

मुंबई आणि महाराष्ट्रात बेपत्ता होणाऱ्या मुला-मुलींच्या आकडेवारीने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, 2021 ते 2024 या काळात मुंबईत बेपत्ता मुला-मुलींचे प्रमाण जवळपास 30 टक्क्यांनी वाढले आहे. या वाढीव संख्येत मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. या गंभीर स्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सरकार नेमके काय करत आहे, असा सवाल केला आहे.

राज ठाकरेंनी आपल्या पत्रात आंतरराज्य टोळ्यांचा उल्लेख केला आहे. या टोळ्या लहान मुलांना पळवून त्यांना कामाला जुंपतात किंवा भीक मागण्यासाठी वापरतात, असे त्यांचे म्हणणे आहे. रेल्वे स्थानकांवर किंवा बस स्थानकांवर भीक मागणाऱ्या मुलांसोबत त्यांचे खरे आई-वडील असतात का, याचा तपास करून गरज पडल्यास डीएनए चाचणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. लहान मुले, तरुण मुली आणि जमिनीही पळवल्या जात असल्याचा आरोप करत, यावर विधिमंडळात चर्चा करण्याची मागणी राज ठाकरेंनी केली आहे.