Ajit Pawar funeral LIVE : अजित पवार यांच्या विमान अपघाताची माहिती सर्वात अगोदर माझ्याकडे- राजेश टोपे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 29, 2026

Ajit Pawar funeral LIVE : अजित पवार यांच्या विमान अपघाताची माहिती सर्वात अगोदर माझ्याकडे- राजेश टोपे

Ajit Pawar funeral LIVE : अजित पवार यांच्या विमान अपघाताची माहिती सर्वात अगोदर माझ्याकडे- राजेश टोपे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल मुंबईहून बारामतीला जात असताना विमान अपघात झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांची बारामतीमध्ये सभा होती. मात्र, अगदी धावपट्टीच्या जवळ विमान अपघात झाला. ज्यावेळी विमान कोसळले, त्यावेळी मोठा धमाका झाला. विमानात असलेल्या 5 जणांचा मृत्यू झाला. सुरूवातीला सांगितले गेले की, अजित पवार या अपघातात गंभीर जखमी आहेत, त्यानंतर काही वेळातच बातमी आली अजित पवार यांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर मोठा धक्का राज्याला बसला. आज 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. अमित शहा अजित पवारांच्या अत्यंसंस्कारासाठी बारामतीत येणार आहेत. अजित पवार यांचे लाखो कार्यकर्ते कालपासून बारामतीत आहेत. हॉस्पिटलबाहेर लोकांचा एकच मोठा आक्रोश बघायला मिळाला. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर शरद पवार यांनी म्हटले की, महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.