Republic Day 2026 Parade LIVE : आज कर्तव्य पथावर जग पाहणार भारताची शान, ताकद, यंदा काय खास? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, January 26, 2026

Republic Day 2026 Parade LIVE : आज कर्तव्य पथावर जग पाहणार भारताची शान, ताकद, यंदा काय खास?

Republic Day 2026 Parade LIVE : आज कर्तव्य पथावर जग पाहणार भारताची शान, ताकद, यंदा काय खास?

आज भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन आहे. याच दिवशी देशात संविधान लागू झालं होतं. कर्तव्य पथावर आज देशाच्या सैन्य शक्तीचा अनोखा संगम पहायला मिळेल. राफेल, सुखोई, जॅग्वार ही फायटर विमानं आपलं कौशल्य सादर करतील. त्याशिवाय देशातील सांस्कृतिक परंपरा आणि सैन्य ताकद यांनी शानदार झलक पहायला मिळेल. कर्तव्य पथासह संपूर्ण दिल्लीत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 10,000 जवान ड्युटीवर तैनात आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला युरोपियन परिषदेच्या अध्यक्ष एंटोनियो कोस्टा आणि यूरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन प्रमुख पाहुणे आहेत. हे वर्ष यासाठी सुद्धा खास आहे की, यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. कर्तव्य पथाला भव्यतेने सजवण्यात आलं आहे.