हवामानात मोठा बदल, आज दिवसभर ढगाळ वातावरणासह दुपारी… - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 4, 2026

हवामानात मोठा बदल, आज दिवसभर ढगाळ वातावरणासह दुपारी…

हवामानात मोठा बदल, आज दिवसभर ढगाळ वातावरणासह दुपारी…

राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती निर्माण झाली. गेल्या दोन दिवसांपासून काही भागात पावसाचा इशारा देण्यात येतोय. आजही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. शिवाय पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला. डिसेंबर महिन्यात चांगली होती. मात्र, त्यानंतर जानेवारी महिन्यात थंडी गायब झाली. फेब्रुवारीत तर पावसासोबत उकाडा जाणवत आहे. सतत हवामानात बदल होत असल्याने त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होत आहे. यासोबतच मुंबईमधील प्रदूषण हा गंभीर विषय बनला. मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून सतत वायू प्रदूषणात सतत वाढ होत आहे. ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. श्वसनासंबंधित आजारही उद्धभवत आहेत. आजही दिवसभर तापमानात चढउतार बघायला मिळेल. ढगाळ वातावरणासह दुपारच्या वेळी उकाडा जाणवेल.

राज्यात आता गारठा कमी झाला. उलट उकाडा जाणवत आहे. धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 10.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रत्नागिरीत 34.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील उच्चांकी तापमान रत्नागिरीत होते. राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळेल. सध्या पावसाला पोषक असे वातावरण राज्यात आहे. काही भागात आजही पाऊस होण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतात सध्या मोठं संकट असून कडाक्याची थंडी असून बर्फवृष्टी आणि पाऊस पडत आहे. बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली आहे. हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये सकाळी श्यमानता शून्यावर आली. यासोबतच कडाक्याची थंडीही आहे. अनेक भागात थेट शाळांना आणि कॉलेजला थेट सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या.

राजस्थानमध्ये किमान तापमानातही 2-4 अंश सेल्सिअसने घट झाली. पूर्व राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुके पसरले आहे, तर थंड वाऱ्यांमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे  गुलमर्ग, रोहतांग, कुल्लू आणि मनाली सारख्या उंचावरील भागात 5-16 सेमी बर्फवृष्टीसह नवीन बर्फवृष्टी झाली. उत्तरेकडे कडाक्याची थंडी असताना दुसरीकडे राज्यात उकाडा जाणवत आहे.