GT vs SRH : रबाडा-होल्डरचा कहर, गुजरातचा सर्वात मोठा विजय, हैदराबादचा 82 धावांनी धुव्वा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 13, 2026

GT vs SRH : रबाडा-होल्डरचा कहर, गुजरातचा सर्वात मोठा विजय, हैदराबादचा 82 धावांनी धुव्वा

GT vs SRH : रबाडा-होल्डरचा कहर, गुजरातचा सर्वात मोठा विजय, हैदराबादचा 82 धावांनी धुव्वा

साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांच्या अर्धशतकी तडाख्यानंतर जेसन होल्डर- कगिसो रबाडा या जोडीने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत गुजरात टायटन्सला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवून दिला आहे. गुजरातने आयपीएल 2026 (IPL 2026) स्पर्धेतील 56 व्या सामन्यात हैदराबादसमोर 169 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे हैदराबाद हा सामना जिंकून 2 गुण मिळवेल असं वाटत होतं. मात्र गुजरातच्या गोलंदाजांनी कमाल केली. गुजरातच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने हैदराबादला झटके देत 168 धावांचा यशस्वी बचाव केला.

हैदराबादचं 86 धावांवर पॅकअप

हैदराबादला संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. गुजरातने हैदराबादला 31 बॉलआधी गुंडाळलं. गुजरातने हैदराबादला 14.5 ओव्हरमध्ये 86 रन्सवर गुंडाळलं. गुजरातने यासह 2 गुण मिळवले. गुजरातचा हा एकूण आठवा आणि सलग पाचवा विजय ठरला. गुजरातचा नरेंद्र मोदी स्टेडियमधील हा 19 व्या मोसमातील 6 सामन्यांतील चौथा विजय ठरला. गुजरातचा हा धावांबाबत सर्वात मोठा विजय ठरला. गुजरातने यासह प्लेऑफमधील आपलं स्थान जवळपास निश्चित केलंय. तर हैदराबादचा हा एकूण चौथा पराभव ठरला.