
अनुभवी फलंदाज विराट कोहली याने केलेल्या नाबाद आणि विस्फोटक शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोलकाता नाईट रायडर्सवर आयपीएल 2026 स्पर्धेतील 57 व्या सामन्यात जबरदस्त असा विजय मिळवला आहे. अंगकृष रघुवंशी आणि रिंकु सिंह या दोघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर केकेआरने आरसीबीसमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 5 बॉलआधी 6 विकेट्स राखून सहज पूर्ण केलं. आरसीबीने 19.1 ओव्हरमध्ये 194 धावा केल्या. आरसीबीने अशाप्रकारे 2 गुणांची कमाई केली. आरसीबीचा हा आठवा तर केकेआर विरुद्धचा पहिला विजय ठरला.