
राज्यात मॉन्सूनच्या पावसाने हाहाकार घातला. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सतत सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर स्थिती आहे. सखल भाग जलमय झालीत. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. काल दुपारनंतर पावसाचा जोर वाढताना दिसला. राज्यात अतिवृष्टी होतंय. जून महिन्यात नसलेला पाऊस कोसळताना दिसत आहे. रेल्वेवरही या पावसाचा परिणाम झाला. अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा असे आवाहन प्रशासनाकडून केले जातंय. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून सूर्यदेवाचे दर्शनही झाले नाही. पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. मुंबईमध्ये काल तीन मजली मोठी इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. मुंबई, पुणे, रायगडमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता.
पुण्यात रात्रभर जोरदार पावसाची हजेरी होती. पुण्यातील अनेक रस्त्यावर पाणी साचले हवामान विभागाकडून घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचला असून रस्त्यावर झाडपडीच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे तर पुणे मुंबई रस्ता बंद करण्यात आला आहे.
नागरिकांनाही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, नदी-नाले व धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे तसेच स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे प्रशासनाकडून सांगितले जातंय. आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. मावळ तालुक्यातील पाटण गावात आज पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना. संबंधित घरातील तीन लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पुणे येथील 5व्या बटालियनची मदत मागविण्यात आली आहे. यात एकूण 30 जणांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. सध्या बचावकार्य सुरू असून, अधिकृतरीत्या कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद झालेली नाही. सकाळीही पाऊस सुरूच आहे.
महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचा वेण्णा लेक पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे. महाबळेश्वर मध्ये सुरु असलेल्या दमदार पावसामुळे वेण्णा लेक हा यावर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने भरल्याने लेक च्या सांडव्यातून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षी जून महिन्यात हा तलाव भरला होता.
मानखुर्दमधील जनता नगरमध्ये 3 मजली घर कोसळली. NDRF, अग्निशमन दल, पोलीस आणि BMC कडून युद्धपातळीवर बचावकार्य दुर्दैवी घटनेत घर कोसळून 6 जणांचा मृत्यू मृतांमध्ये 5 लहान बालकांचा समावेश एक जखमी; रुग्णालयात उपचार सुरू मुसळधार पावसात रात्रभर मलबा हटवण्याचे काम सुरू सुरू होते.