मोठी बातमी! रेल्वे पूल उडवला, चाबहार बंदरावरही मोठा हल्ला, इराण पुन्हा हादरला, थेट.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 9, 2026

मोठी बातमी! रेल्वे पूल उडवला, चाबहार बंदरावरही मोठा हल्ला, इराण पुन्हा हादरला, थेट..

मोठी बातमी! रेल्वे पूल उडवला, चाबहार बंदरावरही मोठा हल्ला, इराण पुन्हा हादरला, थेट..

इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. होर्मुज खाडीजवळ मालवाहू जहाजांवर मोठा हल्ला करण्यात आला. आता त्याच हल्ल्यांना अमेरिकेने जगाची झोप उडवणारे उत्तर दिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर विनाशकारी हल्ला करण्याची धमकी दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे बोलले तेच करून दाखवले. त्यांनी इराणवर मध्यरात्री आतापर्यंतचा भीषण हल्ला केला. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढताना दिसत आहे. हा तणाव फक्त या दोनच देशांपुरता मर्यादित राहत नाही. याचे गंभीर परिणाम जगातील सर्वच देशांना भोगावी लागतात. अमेरिकेच्या सैन्याने इराणवर हल्लाबोल केला. अमेरिकेच्या लष्कराने इराणच्या अब्बास बंदरसोबतच सीरिकसोबत काही भागात मोठे हल्ले केले.

इराणी एजन्सी मिजान यांच्या रिपोर्टनुसार, अब्बास बंदर आणि सीरिक परिसरात बॉम्बचे आवाज आले. इराणी न्यूज एजन्सी मेहरने देखील अब्बास बंदरावरील हल्ल्याची पुष्टी केली. या हल्ल्यात काही मच्छिमार ठार झाल्याची माहिती मिळतंय. चाबहार, कोनारक या बंदरांजवळची बॉम्बचे आवाज आले. चाबदहार बंदराजवळ या हल्ल्यानंतर वीज गेली. हेच नाही तर सर्वात धक्कादायक म्हणजे अमेरिकेने अक्कालामध्ये एक रेल्वे ब्रिज देखील उडवला.

US attack on Ira

US attack on Ira

अबू व्दिपजवळ तब्बल 10 बॉम्बचे आवाज आले. धक्कादायक बाब म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर चाबहार बंदरादरम्यानच्या हल्ल्याचा फोटो शेअर केला. ज्यात पूर्ण आग लागलेली दिसत आहे. फोटो शेअर करत डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले की, इराणने जहाजांवर केलेल्या हल्ल्यांना हे उत्तर आहे. जर पुन्हा त्यांनी हल्ला करण्याची हिमत केली तर उत्तर यापेक्षा खूप जास्त भयंकर आहे.

चाबदार बंदर हे भारतासाठी महत्वाचे आहे. भारतानेच हे बंदर विकसित केले आहे. आता त्याला देखील अमेरिकेकडून टार्गेट केले जात आहे. अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यामुळे इराणमध्ये हाहाकार माजला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध पुन्हा एकदा पेटताना दिसत आहे. कालच होर्मुज खाडीत जहाजांवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली होती.