Maharashtra Rain Update : राज्यात अतिवृष्टी, आजही पावसाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 8, 2026

Maharashtra Rain Update : राज्यात अतिवृष्टी, आजही पावसाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात..

Maharashtra Rain Update : राज्यात अतिवृष्टी, आजही पावसाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात..

राज्यात मागील 5 दिवसांपासून पाऊस धुमाकूळ घालताना दिसला. रेड अलर्ट दिला जात होता. जून महिन्यात जेवढा पाऊस कोसळणार होता तेवढा पाऊस 1 जुलैपासून 6 जुलैपर्यंत कोसळला. नाशिकला ढगफुटीचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला होता. तशी तयारीही सुरू होती. पण ते ढग पालघर आणि गुजरातच्या दिशेने पुढे गेले. त्यामध्येच राज्यात पाऊस ओसरताना दिसत आहे. आजही काही जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. रात्रभर काही भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्हा आणि पुणे घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला. दक्षिण गुजरात केरळच्या किनाऱ्यालगत किनारपट्टी समांतर कबी दाबाचा पट्टा निर्माण झाला. पुण्यातील भिडे पुल पाण्याखाली गेला. पुण्यातील खडकवासला धरणाच्या पातळीत वाढ झाली. मुंबईत आज पावसाची विश्रांती असून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला.

गेल्या सात ते आठ दिवसापासून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे खडकवासला धरणातील पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ झाली. खडकवासला धरणातून 27000 क्युसेसने मुठा नदी पात्रात विसर्ग सुरू झाला. एकता नगर सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासनाकडून उपायोजना केल्या जात आहेत. 4 पडणाऱ्या मुसळधार पावसानंतर मुंबईत आज सकाळी पावसाने विश्रांती घेतली.

मुंबई आणि उपनगरात रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे. मध्य रेल्वे 5 मिनिटे उशिरा सुरु तर हार्बर आणि ट्रांस हार्बर 10 मिनिटे उशिरा सुरू आहे. आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत रात्री मुसळधार पाऊस झाला. ज्यामुळे अनेक भागात पाणी साचले. वरळी गावात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले. आजही पावसाचे संकट टळले नाही.

रायगड, पालघर, कोल्हापूर आणि रत्नागिरी येथील घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात पाऊस होऊ शकतो. गुजरातसह अरबी समुद्र राजस्थानच्या दिशेने मॉन्सून प्रगती करेल. दोन ते तीन दिवसात मॉन्सून अरबी मसुद्र, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या दिशेने पुढे सरकेल आणि पूर्ण देशच व्यापून टाकेल. देशात पुढील काही दिवसात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे.