PM Narendra Modi : अमेरिकेकडून 100 टक्के टॅरिफ लागू होताच PM मोदी अॅक्शन मोडमध्ये - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 9, 2026

PM Narendra Modi : अमेरिकेकडून 100 टक्के टॅरिफ लागू होताच PM मोदी अॅक्शन मोडमध्ये

PM Narendra Modi : अमेरिकेकडून 100 टक्के टॅरिफ लागू होताच PM मोदी अॅक्शन मोडमध्ये

रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिकेने कारवाईचा धडाका लावला आहे. कारवाई करण्यात आलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. अमिरेकीने या देशांविरोधात 100 टक्के टॅरिफ लागू केला आहे. अमेरिकेच्या निर्णयाने भारताचं टेन्शन वाढवलं आहे. खरंतर या निर्णयाचा अमेरिकेच्या खासदारांनीही विरोध केला आहे. अमेरिकेने भारतावर टॅरिफ स्वरुपातील निर्बंध लादल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. यादरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद झाल्याचे समोर आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स या दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून संवाद झाला. दोन्ही नेत्यांमध्ये भारत-अमेरिका व्यापारावर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांच्या संवादाचा तपशील आता समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच त्यांच्या संवादाचा तपशील सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितला आहे.

दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे.डी. व्हान्स आणि त्यांची पत्नी उषा व्हान्स यांना पुत्रप्राप्तीबद्दल अभिनंदन केलं. तसेच त्यांनी संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांची इतर विषयांवरही चर्चा झाली.

 

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या खासदाराची भारतावर टीका 

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे खासदार रिले मूर यांनी भारताच्या परकीय योगदान नियमन कायदा यातील प्रस्तावित बदलांवरून चिंता व्यक्त केली होती. कायद्यातील या बदलांमुळे चर्च आणि धार्मिक संस्थावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच हा बदल ख्रिश्चनांच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर भारतानेही प्रत्युत्तर दिलं होतं. या कायद्यातील बदल हा देशातील अंतर्गत बाब आहे, असे भारताने प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी अमेरिकेसह इतर देशांचे परकीय निधीसंदर्भातील कायदे निदर्शनास आणून दिले आहे.

मागील वर्षी काय चर्चा झाली होती?

जे.डी. व्हान्स यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मागील वर्षी 2025 साली फोनवरून संवाद झाला होता. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता. त्यावेळी मोदींनी त्यांच्या फोनवरून संवाद साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत देखील या संभाषणाचा उल्लेख केला होता. त्यांचे अनेक मिस्ड कॉल आल्यानंतर त्यांना कॉल केल्याचे त्यांनी सांगितले होतं. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर भारताचेही प्रत्युत्तर आणखी जोरदार असल्याचेही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान यंदा दोन्ही नेत्यांमध्ये फोन कॉलवर अमेरिका आणि भारतामधील धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्याविषयी चर्चा झाली.