
इगतपुरी तालुक्यातील तांदूळ भेसळीच्या आरोपांवरून भूमिपुत्र फाउंडेशनचे विनोद नाठे आक्रमक झाले आहेत. परराज्यातून तांदूळ आणून घोटीत भेसळ केली जात असून इगतपुरी-घोटी-त्र्यंबकेश्वरच्या नावाने हा तांदूळ देशभर विकला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे तालुक्याची बदनामी होत असल्याचे सांगत नाठे यांनी चौकशीची मागणी केली आहे. याबाबत नाशिक जिल्हा परिषद CEO ओंकार पवार आणि नरहरी झिरवाळ यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले.
इगतपुरी तालुक्यातील तांदूळ भेसळीच्या आरोपावरून विनोद नाठे आक्रमक झाले आहेत. परराज्यातून तांदूळ आणून घोटीत भेसळ केली जात असल्याचा नाठे यांचा आरोप आहे. इगतपुरी-घोटी-त्र्यंबकेश्वरच्या नावाने भेसळयुक्त तांदूळ देशभर विकला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तांदूळ भेसळीमुळे इगतपुरी तालुक्याची बदनामी होत असल्याचा नाठे यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांना तांदळाला योग्य भाव मिळत नसताना भेसळयुक्त तांदूळ तालुक्याच्या नावाने विकला जात असल्याचा दावा केला आहे.
नाशिक जिल्हा परिषद CEO ओंकार पवार यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह चौकशीच्या मागणीसाठी गेले होते नाठे. यावेळी त्यांनी
नरहरी झिरवाळ यांची बैठक सुरू असल्याने कार्यालयाबाहेर थांबल्याची नाठे यांनी माहिती दिली. बैठक संपल्यानंतर झिरवाळ यांच्याशी तांदूळ भेसळीच्या मुद्द्यावर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. संवादाचे रेकॉर्डिंग करण्यासाठी मोबाईल शेतकऱ्याच्या हातात दिल्याचा नाठे यांचा दावा आहे. दरम्यान, झिरवाळ यांच्या स्वीय सहाय्यकाने मोबाईल बंद करून घेतल्याचा नाठे यांचा आरोप आहे.
‘परवानगी घेतली का?’ असा सवाल करत मोबाईल हिसकावल्याचा आरोप
यानंतर नाठे यांनी स्वतः सेल्फी व्हिडिओ करत झिरवाळ यांना तांदूळ भेसळीबाबत सवाल केले. झिरवाळ यांनी प्रश्नावर उत्तर न देता तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याचा नाठे यांचा दावा आहे. पण वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा नाठे यांचा आरोप. स्थानिक भुरटे नेत्यांच्या भेटींमुळे कारवाई होत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तांदूळ भेसळीच्या आरोपांची संबंधित यंत्रणेकडून चौकशी करण्याची नाठे यांची मागणी घोटीतील तांदूळ भेसळीच्या प्रकरणात तुकाराम मुंडे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केल्याने तांदूळ भेसळीच्या आरोपांवर प्रशासन काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे.