
Ambadas Danve on Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केला. महाजन यांचे नातेवाईक बोगस ऑर्डरमध्ये पकडले आहेत. महाजन सत्तेचे फळ चाखण्यात व्यस्त आहेत, असा घणाघातही दानवे यांनी घातला. जळगावमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही जहरी टीका केली.
जनतेचे काही देणेघेणे नाही
महाजन यांना जनतेच्या सुखदुःखाचे काहीएक देणेघेणे नाही. ते मुंबईत जास्त असतात, जिल्ह्यात काहीच नाहीत. गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केला. जळगावमधील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हा टोला लगावला. महाजनांचे नातेवाईक बोगस ऑर्डर करण्यामध्ये पकडल्या गेले आहेत. ते सत्तेचे फळ चाटण्यामध्ये व्यस्त आहेत. जनतेच्या सुखदुःखात यांना काही घेणेदेणे नाही मुंबई या ठिकाणी जास्त असतात जिल्ह्यात काहीच नाही, अशी टीका त्यांनी केली.
500 कोटी भाजपच्या मीडियाचा इन्चार्ज
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी टाकलेल्या 500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 500 कोटी हे भाजपच्या मीडियाचा इन्चार्ज आहे. त्या महिलांना माहिती आहे. 500 कोटी रुपये कोणी दिले आणि कसे दिले? असे दानवे म्हणाले. या ऑडिओ क्लिपमधील आवाज असलेल्या महिलेवर गुन्हा दाखल करायला पाहिजे. तिची चौकशी करून तिला तुरूंगात टाकायला हवे, अशी मागणी दानवे यांनी केली. तुमचा अथवा माझा विषय असता तर पोलिसांनी पकडून नेलं असतं. आता या राज्यातील पोलीस काय झोपलेली आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी विचारला.
आज अजित दादांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
जळगावातील जिल्हा बँकेत आज अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा होत आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा बँकेत पुतळा परिसरात स्वच्छता व रंगरंगोटी केली गेली. कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार असून मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीची शक्यता आहे. अनावरण झाल्यानंतर जळगावातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात मान्यवरांच्या मनोगताचा कार्यक्रम होणार आहे. अजितदादा यांचा बारामती नंतर दुसरा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा असल्याचे सांगितले जात आहे.