अभिजीत दिपके कुठंय? CJP चा दिल्ली पोलिसांना सवाल, नेहा बोरा हिला मध्यरात्री भेटले वकील - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 17, 2026

अभिजीत दिपके कुठंय? CJP चा दिल्ली पोलिसांना सवाल, नेहा बोरा हिला मध्यरात्री भेटले वकील

अभिजीत दिपके कुठंय? CJP चा दिल्ली पोलिसांना सवाल, नेहा बोरा हिला मध्यरात्री भेटले वकील

Abhieet Dipke-Neha Bora Tiranga March: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हापासून त्यांच्याविषयीची माहिती समोर आली नाही. तर ऑल इंडिया स्टुडेंट्स असोसिएशनने (AISA) दावा केला आहे की, अध्यक्ष नेहा बोरा हिची माहिती मिळाली आहे. त्यांना अनेक तास एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर मध्यरात्री वकिलांना त्यांना भेटता आले. आरके पूरम पोलीस ठाण्यात नेहा आणि वकीलांची भेट झाली.

त्यापूर्वी जवळपास पाच तास त्यांना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. पोलिसांनी अद्यापही नेहा बोरा यांना केव्हा सोडणार याची अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यांची तब्येत खराब आहे. पण पोलिसांनी त्यांना कोणते औषधं देऊ दिले नाही. याबद्दल विद्यार्थी संघटनेने पोलिसांवर नाराजी व्यक्त केली.

नेहाला केव्हा सोडणार?

AISA ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात पोलिसांनी नेहाला मध्यरात्रीपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये का ठेवले? नेहाची कधी सूटका करणार? एका महिला नेत्याला पोलीस अशी वागणूक कशी देऊ शकतात, असे प्रश्न विचारण्यात आले. सीजेपीने आरोप लावला आहे की, अभिजीत दिपके यांना अज्ञात स्थळी ठेवण्यात आले आहे. त्यांच्याविषयी कोणतीच माहिती समोर आलेली नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा वकील प्रयत्न करत आहेत, पण अद्याप संपर्क होऊ शकला नाही.

तरुणांना दहशतवाद्यांसारखी वागणूक

सीजेपीने पोलिसांच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे. सरकार तरुणांसोबत एखाद्या दहशतवाद्यांप्रमाणे व्यवहार करत आहे. आम्ही भारताचे नागरीक आहोत. घटनात्मक अधिकार आणि संरक्षण मिळण्याचा अधिकार तरुणांना आहे. अभिजीत दिपके यांना कुठं ठेवलंय? असा सवाल सीजेपीने पोलिसांना विचारला आहे. आता तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल असा इशारा सीजेपीने दिला आहे. अभिजीत हे तिरंगा घेऊन बाहेर पडले होते. तिरंगा घेऊन बाहेर पडणे गुन्हा आहे का? असा खरमरीत सवाल दिपके यांनी विचारला.

हजारो अभिजीत उभे राहतील

सीजेपीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनुसार, तुम्ही एका अभिजीतला ताब्यात घ्याल. तर हजारो अभिजीत तयार होतील. तुम्ही एका सौरवला तुरुंगात डांबाल तर हजारो सौरव रस्त्यावर उतरतील. तुम्ही एका आशुतोषला तुरूंगात टाकाल तर हजारो आशुतोष दिल्लीत पोहचतील. तिरंगा आमचा प्राण आहे. आमची शान आहे. आम्हाला कोणी थांबवू शकत नाही, असा इशारा देण्यात आला आहे.