चिंतेचं कारण नाही; अजितदादा सगळं सांगतील: शरद पवार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 28, 2019

चिंतेचं कारण नाही; अजितदादा सगळं सांगतील: शरद पवार

https://ift.tt/2mzzIdb
मुंबई: ' हे स्पष्ट बोलणारे नेते आहेत. ते कधी हातचं राखून बोलत नाहीत. त्यामुळं काय झालं? कसं झालं? त्यांच्या मनात काय आहे? हे सगळं तुम्ही त्यांच्या तोंडूनच ऐका,' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आज सांगितलं. 'चिंता करण्याचं कारण नाही,' हे मात्र त्यांनी आवर्जून सांगितलं. त्यामुळं पवारांच्या राजीनाम्याचं आणि भूमिकेचं गूढ अधिकच वाढलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काल तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळं राष्ट्रवादीतील व पवार कुटुंबातील अंतर्गत कलहाची चर्चा पुन्हा सुरू झाली होती. राजीनाम्यानंतर अजितदादा 'नॉट रिचेबल' झाल्यानं त्यात भर पडली. अखेर आज दुपारी ते मुंबईत शरद पवारांना भेटले. पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे, अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार व बंधू श्रीनिवास पवार हेही यावेळी उपस्थित होते. या सर्वांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. मात्र, या चर्चेत नेमकं काय झालं, हे सांगण्यास दोघांनीही नकार दिला. वाचा: शरद पवार पत्रकारांना सामोरे गेले खरे, पण त्यांनी अजित पवारांकडं बोट दाखवलं. 'आजच्या भेटीत आम्ही फक्त राजकारणावरच चर्चा झाली नाही. आमच्या घरातील मुलाबाळांच्या लग्नाबद्दलही चर्चा झाली. बाकी जे काही सांगायचं ते अजित पवार तुम्हाला सांगतील. एक-दोन सहकाऱ्यांशी बोलून त्यांना मत मांडायचं आहे,' असं पवार म्हणाले. त्यामुळं आता अजितदादा नेमकी काय भूमिका मांडतात, याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. वाचा: